शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम आराखडा मंजुरीसाठी रखडले, नव्या उपाययोजनांचा आराखडा केंद्राकडे

By संदीप बांद्रे | Updated: February 14, 2024 12:42 IST

संदीप बांद्रे चिपळूण (जि. रत्नागिरी ) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलावरील लाँचर ...

संदीप बांद्रेचिपळूण (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलावरील लाँचर आणि तुटलेले गर्डर हटविण्यात आले. या घटनेनंतर उड्डाणपुलाचा आराखडा बदलून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. नव्या आराखड्यात दोन पिलरच्या मध्ये आणखी एक वाढीव पिलर उभारण्यात येणार आहे. मात्र, नवीन आराखड्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. बहादूरशेख नाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू करण्यात आले. मात्र, १६ ऑक्टोबर रोजी या पुलाचा काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या.त्यानंतर केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या आराखड्यामध्ये बदल सुचविले होते. या बदलानुसार सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले आहेत. त्यामधील अंतर २० मीटरवर ठेवून तेथे अतिरिक्त पिलर उभा करून गर्डर सिस्टिम करण्याचे सांगण्यात आले. तसा प्रस्ताव ईगल कंपनीकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आला आहे.नव्या आराखड्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच उड्डाणपुलाच्या पुढील कामास सुरुवात केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. उड्डाणपुलाच्या कामाचा प्रस्ताव दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नसल्याने पुलाचे काम ‘जैसे थे’ आहे.

नवीन आराखड्यानुसारच कामकोकण मार्गावरच यापूर्वी ४० मीटरपेक्षा अधिक लांबीचे गाळे उभारून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तिथे नियमित वाहतूकही सुरू आहे. त्या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणत्याही अडचणी आलेल्या नाहीत. मात्र, चिपळुणातील उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर नवीन आराखडा तयार करण्यात आला. या नव्या आराखड्यानुसारच काम करण्याचे धाेरण ईगल कंपनीने स्वीकारले आहे.

  • लांबी १,८४० मीटर
  • रुंदी ४५ मीटर
  • एकूण ४६ पिलर
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण