शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Women's Day Special : फटाके वाजवायलाही घाबरणाऱ्या सीमा बनल्या लेफ्टनंट कॅप्टन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 15:28 IST

लहानपणी फटाके वाजवायलाही घाबरणारी मुलगी फायरिंगमध्ये अव्वल येईल, असे सांगितल्यास कोणालाही खरे वाटणार नाही. पण, एनसीसीमध्ये सहभागी होऊन केवळ फायरिंगमध्ये अव्वल न राहता लेफ्टनंट कॅप्टन पदावर पोहोचण्याची किमया सीमा शशिकांत कदम यांनी साधली आहे.

ठळक मुद्दे फायरींगमध्ये अव्वल, एनसीसीच्या नेव्हलमध्ये सहभागी होऊन आर्मीचा पोशाख दोन्ही ठिकाणची जबाबदारी पार पाडणारी पहिली महिला अधिकारी

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : लहानपणी फटाके वाजवायलाही घाबरणारी मुलगी फायरिंगमध्ये अव्वल येईल, असे सांगितल्यास कोणालाही खरे वाटणार नाही. पण, एनसीसीमध्ये सहभागी होऊन केवळ फायरिंगमध्ये अव्वल न राहता लेफ्टनंट कॅप्टन पदावर पोहोचण्याची किमया सीमा शशिकांत कदम यांनी साधली आहे.सीमा कदम यांचे लांजा तालुक्यातील आसगे येथे घर आहे. प्राथमिक शिक्षण लांजात येथे झालेले. वडील अनंत कांबळे हे त्याकाळी प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आलेले, तर आई प्राथमिक शिक्षिका.

सामान्य कुटुंब असूनही चांगल्या संस्कारांची शिदोरी त्यांना आई-वडिलांकडून मिळाले. बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जाणे ठरले. त्याकाळी मुलीने घरापासून इतक्या लांब राहणे इतरांना न पटणारेच होते. तरीही वडिलांनी दाखविलेल्या विश्वासावर त्या कोल्हापूरला आल्या.वाणिज्य शाखेत शिकत असताना एनसीसीच्या कॅप्टन रूपा शहा यांनी एनसीसीत सामील होण्याची संधी दिली. ही संधीच त्यांच्यासाठी टर्निंग पॉर्इंट ठरली. लहानपणी फटाक्यांना घाबरणाऱ्या सीमा कदम फायरिंगमध्ये मात्र अव्वल ठरल्या.

लक्ष्यावर अचूक नेम साधण्याची किमया करत त्यांनी अजूनही आपले स्थान भक्कम केले आहे. १९९६ला गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात हजर होताना एनसीसीतील सी - सर्टीफिकेटमुळे आणखी एक संधी मिळाली.गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना एनसीसी अधिकारी म्हणून त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याला मंजुरी मिळताच नेव्हलमध्ये त्या अधिकारी म्हणून रूजू झाल्या. मात्र, महिलांसाठी नेव्हलचे प्रशिक्षण केंद्र नसल्याने त्यांना आर्मीचा पोशाख परिधान करून प्रशिक्षण घ्यावे लागले.

यशाचा एक एक टप्पा पार करताना त्यांची लेफ्टनंट कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली. नेव्हल आणि आर्मी या दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या त्या एकमेव महिला अधिकारी बनल्या.करिअर, संसार त्यातून होणारा विकास याला अधोरेखित करून त्यांनी आपले ध्येय गाठण्याचे निश्चित केले. अडीच वर्षाच्या मुलीला घरी ठेवून ग्वाल्हेर येथे पहिल्या प्रशिक्षणाला जावे लागणाऱ्या सीमा कदम यांना त्यांच्या पतीचीही तितकीच साथ मिळाली.

मुलांपासून दूर राहात असताना मनाचा कणखरपणा त्यांना पुढे जाण्याचे पाठबळ देत होते. लेफ्टनंट कॅप्टन म्हणून काम करताना रत्नागिरीत डिफेन्स सेंटर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. हे सेंटर सुरू करून एकतरी सैनिक या मातीतून घडावा, हे त्यांचे स्वप्न आहे.पुरस्कारांनी सन्मानभावी पिढी घडविण्याचे समाधान मिळत असल्याचे त्या आवर्जून सांगतात. स्त्रीने मन खंबीर केले, चिकाटी, सहनशीलता, आत्मविश्वास असेल तर चांगले करिअर घडविता येते, असेही त्या सांगतात. सीमा कदम या करत असलेल्या कामाबद्दल आम्ही उद्योजिका सांगलीतर्फे संजीवनी पुरस्कार, सॅफरॉनतर्फे नवदुर्गा पुरस्कार, दलित साहित्य अ‍ॅकॅडमीतर्फे वीरांगणा सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

घराच्या बाहेर राहिल्याशिवाय आत्मविश्वास येणार नाही, हा वडिलांचा विश्वास होता. आई-वडिलांनी टाकलेला विश्वास कधीच तोडू नये. अजूनही बरचं काही कमावयचं आहे. अंगावरील पोशाख संरक्षण, मान आणि सन्मान देतो, त्याचबरोबर जबाबदारीही शिकवतो. समाजात वावरताना चांगलं अंतर ठेवून काम करा. कोणतही काम रडत करण्यापेक्षा आनंदाने ते करा.- सीमा कदम

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनRatnagiriरत्नागिरी