शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

फिर्याद देणारी महिलाच निघाली खरी चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:34 IST

crimenews, police, rajapur, ratnagirinews राजापूर तालुक्यातील पाचल -मुस्लिमवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या चोरी प्रकरणात खुद्द फिर्यादी असलेली अफसाना ताजुद्दीन टिवले (२५) हीच महिला चोर असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, पैशांसाठी हा चोरीचा बनाव केल्याची कबुली या महिलेने दिली आहे.

ठळक मुद्देफिर्याद देणारी महिलाच निघाली खरी चोरपाचलमधील चोरीचा लागला २४ तासात छडा

राजापूर : तालुक्यातील पाचल -मुस्लिमवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या चोरी प्रकरणात खुद्द फिर्यादी असलेली अफसाना ताजुद्दीन टिवले (२५) हीच महिला चोर असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, पैशांसाठी हा चोरीचा बनाव केल्याची कबुली या महिलेने दिली आहे.यातील चोरीला गेलेला ६८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमालही या महिलेने पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. रायपाटण दूरक्षेत्राचा पदभार स्वीकारताच पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धडकाकेबाज कामगिरी करत अवघ्या २४ तासात या चोरीचा छडा लावला. याप्रकरणी महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गुरूवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या सुमाराला चोरट्याने घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करत सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम अशा सुमारे १ लाख ७९ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची फिर्याद पाचल - मुस्लिमवाडी येथील अफसाना ताजुद्दीन टिवले यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिली होती.

या चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी रत्नागिरीहून श्वान पथकालाही पाचारण केले होते. श्वानपथकाचे प्रमुख भूषण राणे यांनी तत्काळ घटनास्थळी श्वानासह येत पाहणी केली असता, श्वान घरातच या फिर्यादी महिलेभोवती घुटमळत होता. घरातून तो बाहेरच जात नव्हता. त्यामुळे या फिर्यादी महिलेबाबतच शंका आल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला.घरातील मंडळींनाही याबाबत विश्वासात घेत पोलिसांनी या महिलेला विचारणा केल्यानंतर घाबरलेल्या या महिलेने अखेर आपणच चोरी केल्याची कबुली दिली. पैशांची गरज असल्याने आपण हा चोरीचा बनाव केल्याचे नमूद करत दिराच्या कपाटातील रोख रक्कम व दागिने आपण चोरल्याचे या महिलेने सांगितले. मात्र, त्यांच्याच कपाटातील दागिने व रोख रकमेची कशी चोरी झाली, याची कुणाला काही शंका येऊ नये म्हणून आपलेही दागिने आणि पैसे चोरीला गेल्याचा बनाव केल्याचे या महिलेने पोलिसांनी सांगितले.रायपाटण दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण यांची नुकतीच बदली झाली असून, रायपाटण दूरक्षेत्राचा पदभार पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तळेकर यांनी पदभार स्वीकारताच चोरीचा २४ तासात तपास लावत कार्यपद्धतीची चुणूक दाखवली आहे. राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी अनंत तिवरेकर, भीम कुळी, किरण सकपाळ यांनीही विशेष कामगिरी केली आहे. या चोरीच्या तपासात श्वान पथकाचे भूषण राणे यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे तळेकर यांनी सांगितले.अटक आणि कोठडीचोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी दागिने व रोख रक्कम असा सुमारे ६८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमालही या महिलेकडून हस्तगत केला आहे. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी