शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात रत्नागिरीत १६ व्यक्ती आल्या इंग्लंडमधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 16:27 IST

CoronaVirus Ratnagiri-ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १६ परदेशी व्यक्ती आल्या आहेत. यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून येणे बाकी आहे.

ठळक मुद्देमहिनाभरात रत्नागिरीत १६ व्यक्ती आल्या इंग्लंडमधून१५ जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह, एकाचा अहवाल अद्याप बाकी

शोभना कांबळेरत्नागिरी : ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १६ परदेशी व्यक्ती आल्या आहेत. यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून येणे बाकी आहे.कोरोनाचे संकट कमी होते न होते तोच इंग्लंडमधील या नव्या विषाणूने पुन्हा आव्हान निर्माण केले असून, जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आलेल्या परदेशी व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले.

२५ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत १६ व्यक्ती इंग्लंडमधून आल्या आहेत. या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करून स्वॅब घेण्यात आले होते. त्यांपैकी १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांचे २८ दिवस निरीक्षण करण्यात येणार आहे.एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले?एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ९३० विदेशी आले. कोरोनाच्या काळात ग्रामकृती दलाच्या माध्यमातून अशा व्यक्तींची माहिती घेतली जात होती. त्याचप्रमाणे परदेशांतून येणाऱ्या व्यक्तींचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत होते. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जात.विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?विदेशातून येणाऱ्यांची यादी देशाकडून राज्यांना पाठविली जात आहे. राज्यांकडून या व्यक्ती ज्या जिल्ह्यात जाणार आहेत, त्या जिल्ह्यांकडे यादी पाठविली जाते. त्यानंतर या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहितीही आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

 

आरोग्य विभाग सतर्कजिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची माहिती घेतली जात असून, त्यांना तातडीने संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १६ व्यक्ती परदेशातून आल्या आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे सुरु आहे. मात्र, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. बबिता कमलापूरकर, आरोग्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी