शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:38 IST

Political, shivsena, ncp, ratnagirinews राज्यातील सरकार बनवताना वापरलेल्या सुत्राप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही महाविकास आघाडी सामोरी जाणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेणार का, हाही प्रश्न कार्यकर्ते करत आहेत.

ठळक मुद्देस्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार?कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते एकत्र येणार का?

मनोज मुळ्येरत्नागिरी : राज्यातील सरकार बनवताना वापरलेल्या सुत्राप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही महाविकास आघाडी सामोरी जाणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेणार का, हाही प्रश्न कार्यकर्ते करत आहेत.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी केली. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी हा पॅटर्न वापरला जाण्याची अपेक्षा केली जात आहे. त्यानंतर अजून कोणत्याही निवडणुका झालेल्या नाहीत. त्यातही चिपळूण नगर परिषदेत भाजपच्या नगराध्यक्षांना पदावरून खाली आणण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी बनवली आहे. त्याखेरीज अजून हे तीन पक्ष कोठेही एकत्र आलेले नाहीत.कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता मोठ्या प्रमाणात होत आहेत. पुढील आठवड्यात सरपंच आरक्षणाची सोडत निघणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही, हीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाविकास आघाडीची अपेक्षा आहे. मात्र, शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असल्याने शिवसेनेत मात्र अजून त्याबाबत कोणतीही चर्चा नाही. शिवसेनेची ताकद मोठी असल्याने होणाऱ्या निवडणुकांमध्ये वाटेकरी नकोत, असा एक मतप्रवाह असून, राज्य सरकारमध्ये सोबत असल्याने जिल्ह्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घ्यावे, असे मत काही कार्यकर्ते मांडत आहेत. आता नेते एकत्र येऊन यातून काही तोडगा काढतात का, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उभा राहिला आहे.चिपळूण पंचायत समितीत महाविकास आघाडीचिपळूण पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल सारखे आहे. येथेही महाविकास आघाडी करून पदांचे वाटप करण्यात आले आहे. सध्या कार्यरत असलेल्या सभापती, उपसभापतींची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ द्यावी की नवी चेहऱ्यांना संधी द्यावी, याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते रत्नागिरीतील बैठकीत घेतील, असे खासदार विनायक राऊत यांनी याआधीच जाहीर केले आहे. हाच पॅटर्न इतरत्र राबवला जाणार आहे का, याची उत्सुकता कायम आहे.जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला वाटा नाहीराज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेत शिवसेनेकडून राष्ट्रवादीला त्यात सामावून घेतली जाण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र तसे कोणतेच बदल झाले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे आता नेत्यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.

 

शिवसेना आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी होणे आवश्यक आहे. त्याबाबत पक्षाचे नेते, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम निर्णय घेतील. महाआघाडीसाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे.- बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRatnagiriरत्नागिरी