शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

.....त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त ठरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 13:16 IST

लॉकडाऊनची अंमलबजावणी जनतेकडून करण्यात येत आहे़ लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे़  मात्र, शासनाला सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

ठळक मुद्दे१३ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाहीकायदा मोडणाऱ्यांवर कारवाई- जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी तिन्ही यंत्रणांची कसोटी

रत्नागिरी :  जिल्ह्यात कोरोनाचे ६ रुग्ण होते़ शनिवारी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले़ मात्र, गेल्या १३ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळलेला नाही़ त्यामुळे संपूर्ण यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला आहे़ तरीही जिल्ह्याचे आरोग्य कोरोनामुक्त कसे राहील, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा या सर्वांसाठीच पुढील दिवस कसोटीचे ठरणार आहेत़१८ मार्च रोजी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता़ त्यानंतर काही दिवसातच खेड तालुक्यातील अलसुरे, रत्नागिरीतील  राजीवडा-शिवखोल मोहल्ला येथे प्रत्येकी एक आणि साखरतर येथे ३ असे एकूण ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते़ खेडमधील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ या कालावधीतच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले ५३७ संशयित होते़ मात्र, ६ कोरोनाग्रस्तांव्यतिरिक्त ते निगेटिव्ह असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला होता़लॉकडाऊनची अंमलबजावणी जनतेकडून करण्यात येत आहे़ लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे़  मात्र, शासनाला सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.तिन्ही यंत्रणा एकत्रजिल्ह्यातील तिन्ही यंत्रणा हातात हात घालून काम करीत असल्याने या महामारीच्या दिवसांमध्ये त्याचा मोठा फायदा जिल्हावासियांना झाला आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालयात तर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत़साऱ्यांचेच परिश्रमजिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेने जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली़ जिल्हा रूग्णालयातील इतर विभाग अन्यत्र हलवून हे रूग्णालय केवळ कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे लोकांसाठी देवदूत ठरले आहेत़ त्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त ठरला आहे़ 

 

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी