शोभना कांबळेरत्नागिरी : यावर्षी कोरोनाची सावली सर्व सणांवर राहिली. त्यामुळे दिवाळीचे दिवे काही घरांमध्ये प्रकाशले असले तरी झोपडपट्ट्टीत मात्र मंदावलेलेच होते. दरवर्षी विविध सामाजिक संस्था या झोपडपट्ट्यांमध्ये जावून फराळ तसेच दिवाळीच्या साहित्याचे वाटप करतात. परंतु, यावर्षी या दातृत्वांनीही पाठ फिरवल्याने येथील बच्चे कंपनीची दिवाळी फाटक्या कपड्यांवरच साजरी झाली.रत्नागिरी शहरात आठवडा बाजार येथील झोपडपट्टीतील गौरा गोपाळ जाधव यांचे कुटुंब भंगार विकण्याचे काम करते. दोन मुले, सुना आणि त्यांची नातवंडे याठिकाणी राहतात. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचा व्यवसाय बंद राहिला आहे. ज्यांच्या हातात पैसे होते, त्यांनी दिवाळी साजरी केली. मात्र, झोपडपट्टीत राहणाऱ्या उदरनिर्वाहच थांबल्याने अशा कुटुंबांची दिवाळी दिवे, फराळाविना साजरी झाली. जाधव कुटुंबालाही आपली दिवाळी यंदा काळोखातच साजरी करावी लागली.पैसाच नाही तर काय खरेदी करणार? यावर्षी कोरोनामुळे झोपडपट्टीतील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनच थांबल्याने हातात पैसाही नाही, अशी स्थिती अजूनही आहे. पैसाच नाही, त्यामुळे खाण्याचे वांदे मग दिवाळीची खरेदी काय करणार, असा प्रतिप्रश्न झोपडपट्टीत राहणाऱ्या गौरा गोपाळ जाधव विचारतात.मुलांची दिवाळी फाटक्या कपड्यांवरचदरवर्षी झोपडपट्टीतील मुलांना मिठाई, फराळ देणाऱ्यांची संख्या अधिक असते. यावर्षी कोरोना संकटामुळे विविध संस्था किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, व्यक्ती फिरकल्याच नाहीत. त्यामुळे झोपडपट्टीतील मुले फराळ तसेच अन्य वस्तूंपासून यावर्षी वंचितच राहिली आहेत.
सगळं जग प्रकाशलेलं अन् झोपडपट्टीतील दिवे मंदावलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:17 IST
diwali, coronavirus, ratnagirinews यावर्षी कोरोनाची सावली सर्व सणांवर राहिली. त्यामुळे दिवाळीचे दिवे काही घरांमध्ये प्रकाशले असले तरी झोपडपट्ट्टीत मात्र मंदावलेलेच होते. दरवर्षी विविध सामाजिक संस्था या झोपडपट्ट्यांमध्ये जावून फराळ तसेच दिवाळीच्या साहित्याचे वाटप करतात. परंतु, यावर्षी या दातृत्वांनीही पाठ फिरवल्याने येथील बच्चे कंपनीची दिवाळी फाटक्या कपड्यांवरच साजरी झाली.
सगळं जग प्रकाशलेलं अन् झोपडपट्टीतील दिवे मंदावलेलेच
ठळक मुद्देसगळं जग प्रकाशलेलं अन् झोपडपट्टीतील दिवे मंदावलेलेच यावर्षी दातृत्वांची पाठ फिरल्याने बच्चे कंपनीची दिवाळी फाटक्या कपड्यांवरच