शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:27 IST

क्यार वादाळामुळे बदललेल्या वातावरणातून अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. तसेच प्रशासनाने माहा चक्रीवादळाचा इशारा दिल्याने यापूर्वीच जमेल तेवढे पीक वाचविण्याची कसरत शेतकरी करत आहे. आता आम्ही कसं जगायचं? पोराबाळांना काय खायला घालायचं? असा सवाल रडवेल्या अवस्थेत केला.

ठळक मुद्देपोरबाळ अन् जनावरांना काय खायला घालायचं?, शेतकऱ्यांची आर्त विनवणीभौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या गुहागर तालुक्यात भातशेतीचे नुकसान

संकेत गोयथळेगुहागर : क्यार वादाळामुळे बदललेल्या वातावरणातून अवेळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. तसेच प्रशासनाने माहा चक्रीवादळाचा इशारा दिल्याने यापूर्वीच जमेल तेवढे पीक वाचविण्याची कसरत शेतकरी करत आहे. आता आम्ही कसं जगायचं? पोराबाळांना काय खायला घालायचं? असा सवाल रडवेल्या अवस्थेत केला.शेतावर कामाच्या लगबगीत शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यामधून शेतकऱ्यांची मानसिक स्थिती किती ढासळली आहे हे लक्षात आले. शेतावर भेट घेतली असता साऱ्यांच्याच चेहऱ्यावर फक्त चिंता होती. साहेब काही तरी करा हो. एवढी मेहनत करुन थोडे पीक तरी हातात लागायला हवे होते.

आज बोलावलेल्या मजुरांना ४०० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागते. पैसे खर्च होऊनही पूर्ण नुकसानच होणार असेल तर चालणार कसे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी विचारले. वेळंब येथील सचिन माळी यांनी सांगितले की, गेले चार दिवस फक्त भिजलेला पेंढाच बाजूला करुन तो सुकवत आहोत.

बहुतांश पेंढा ओला होऊन फुकट गेला आहे. आता या शेतामधून जे मिळेल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईमध्ये प्लंबिंग काम करतो. आई, बायको शेती बघतात. त्यांना मदत करण्यासाठी आलो. पण येथील स्थिती चिंताजनक आहे.तालुक्यात १२२ गावे असून, काम जलदगतीने व्हावे, यासाठी तलाठी २२ गावे, ग्रामसेवक ५७, तर कृषी सहाय्यक ४३ अशा विभागणीने पंचनामे करण्यात आले. दि. २ नोव्हेंबरला अंतिम तारीख देण्यात आली होती. या दिवशी रविवार असूनही तलाठ्यांकडून आवश्यक सातबारे उपलब्धता व अर्ज भरुन घेण्यात आले.

सोमवारी प्रांताधिकाऱ्यांनी विशेष भेट देऊन कामाचा आढावा घेतला व मंगळवारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्ज आल्याचे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.उत्पादन निम्म्याहून घटलेअनेक शेतकऱ्यांकडे गुरे आहेत. शेतातून आलेला पेंढा वर्षभर गुरांना पुरवतात. मात्र ओला पेंढा फेकून देण्याची वेळ आली आहे. या पेंढ्यात अळ्या होत आहेत. अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती अर्धळीवर करत असतात. त्याची स्वत:ची शेती नसते. अशाच वेळंब येथील विजया कुंभार यांनी सांगितले की, गेल्यावर्षी २२ गुंठ्याला दोन खंडी भात मिळालं. आज १० मण मिळेल की, नाही सांगता येत नाही.किती क्षेत्र झाले बाधित?तालुक्यात ३ हजार १२८ इतकी शेतकरी संख्या आहे. यापैकी २ हजार ९४७ शेतकऱ्यांचे एकूण ५५१.२७ हे. आर. क्षेत्रापैकी ५२२.३ हेक्टर आर क्षेत्रात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अंदाजे ३७ कोटी ४८ हजार ६३६ एवढी नुकसान भरपाई मिळू शकते. शासनाच्या बदलत्या निकषानुसार यामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

गेले आठ दिवस शेतावरच आहोत. उरले सुरले पीक मिळविण्यासाठी पुन्हा पाऊस पडण्याआधीच ह्यमळणीह्ण काढायला घेत आहोत. शासनातर्फे चालू असलेले पंचनामे तसेच यासाठी अर्ज करण्याबाबत आपल्याला अद्याप काहीच माहिती नसल्याचे सांगत शेत वाचवायचं की, शासनाकडून मिळणाऱ्या तूटपुंज्या अनुदानासाठी फेऱ्या मारायच्या. त्यापेक्षा शासनाने सर्वांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी.- अनंत गावडे,कीर्तनवाडी, गुहागर

भिजलेल्या पेंढ्या हाताळतानाच भाताच्या लोंब्या (अर्ध्या अधिक) जमिनीवर पडत आहेत. यामुळे एवढ्या मेहनतीनंतरही फार कमी पीक शेवटी मिळत आहे. जमिनीवर पडलेला एक एक दाणा आणि भाताच्या लोंब्या एकत्रित ताडपत्रीवर घेऊन अनेक ठिकाणी सुकविताना शेतकरी दिसत आहे. पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी घराची पडवी तसेच अंगणात आणलेले भात झोडताना दिसत आहेत.- सुनीता शिंदे, वरवेली शिंदेवाडी- सुनील माळी, वेळंब

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी