शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस वाट पाहिल्यानंतर रत्नागिरीकरांना मिळणार आनंदाची माहिती- काय काय मिळणार सवलती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:09 IST

जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काहीशी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकाही उद्योगांना मिळणार परवानगी कामगारांचे स्थलांतर नाहीच मिठाई दुकाने होणार सुरू

रत्नागिरी : कोरोनाला अटकाव करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. २० एप्रिलनंतर यात शिथिलता देण्यात येणार आहे. मात्र, शिथिलता देताना कठोर नियमावली लागू आहे. २०एप्रिल नंतर शासकीय कामे, काही उद्योग, पावसापूर्वी कामे, नरेगा, अत्यावश्यक वाहतूक, महामार्गाचे काम, चिरेखाणी, मिठाई दुकाने सुरू होणार आहे. मात्र, त्या-त्या ठिकाणच्या कामगारांच्या माध्यमातून ही कामे केले जाणार आहेत. कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.२२ मार्च ते १४ मार्च अशी २१ दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले. उद्योग, व्यवसाय, व्यापार, वाहतूक आदी जिथल्या तिथे थांबले. याचा सर्वच घटकांवर मोठा परिणाम झाला. उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून देश, कामगार वर्ग उद्योग, व्यवसाय सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व अभ्यास करून जिल्हाअंतर्गत २० तारखेपासून शिथिलता आणली जाणार आहे.जिल्ह्यातील काही उद्योग सर्व अटी-शर्ती घालून सुरू करण्यात येत आहेत. शासकीय कामे, पावसापूवीर्ची कामे, नरेगा, अत्यावश्यक वाहतूक, खासगी दवाखाने, मुुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम, चिरेखानी, मिठाई, फरसाण दुकान, मॅन्युफॅक्चीरिंग आदी सुरू केले जाणार आहे. जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काहीशी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

टॅग्स :konkanकोकणcorona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी