शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रत्नागिरी : देवाचा लग्नसोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी, मार्लेश्वर-गिरीजादेवीचा कल्याणविधी थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 11:18 IST

सहयाद्री पर्वत रांगांवर वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) सोहळा रविवारी हरहर मार्लेश्वर, शिव हरा शिव हरा च्या गजरात हिंदू लिंगायत पध्दतीने सुमधूर मंगलाष्टकांनी दुपारी २ वाजून १५ मिनिटे या शुभमुहुर्तावर राज्यातील लाखो भाविक व प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला.

ठळक मुद्दे३६० मानकऱ्यांच्या उपस्थितीत कल्याण विधीचा प्रारंभ देवरूख येथील वाडेश्वर, मानकरी, पालख्या, दिडींचे व मंडळींचे मार्लेश्वर पवई येथे आगमन त्रिपूर उजळून दीपोत्सव साजरा , धार्मिक विधीनुसार मार्लेश्वर देवतेच्या गुहेसमोरील सभा मंडपात विवाह सोहळा

देवरूख : सहयाद्री पर्वत रांगांवर वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) सोहळा रविवारी हरहर मार्लेश्वर, शिव हरा शिव हरा च्या गजरात हिंदू लिंगायत पध्दतीने सुमधूर मंगलाष्टकांनी दुपारी २ वाजून १५ मिनिटे या शुभमुहुर्तावर राज्यातील लाखो भाविक व प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला.प्रतिवर्षाप्रमाणे मकरसंक्रातदिनाचे औचित्य साधून रविवारी हा विवाह सोहळा (कल्याणविधी) भाविकांच्या अलोट गर्दीच्या उपस्थितीत दुपारी २.१५ वाजता या शुभमुहुर्तावर गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदाह्ण या मंजूळ स्वरात व सनई चौघडे, ताशांच्या वाजंत्रीत उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला गोठणे गावची करवली नटून थटून आली होती.

साखरपा येथील वधू गिरीजा देवीची पालखी, मार्लेश्वराची पालखी व सोहळ्याचे यजमान देवरूख येथील वाडेश्वर, मानकरी, पालख्या, दिडींचे व मंडळींचे शनिवारी रात्री मार्लेश्वर पवई येथे आगमन झाले होते. त्यांचे रविवारी सकाळी विवाहस्थळी स्वागत करून ३६० मानकऱ्यांच्या उपस्थितीत कल्याण विधीचा प्रारंभ के ला गेला. धार्मिक कार्यक्रमादरम्यान दुपारी २ वाजता श्री मार्लेश्वर देवाला हळद चढवून कल्याणविधी सोहळ्याला सुरूवात करण्यात आली.यावेळी रायपाटण, लांजेकर स्वामी, म्हसोळी महाराज या तीनही स्वामींना मार्लेश्वर मंदिराजवळ आणून पाद्य पूजा व त्यांना आसनस्थ करून त्रिपूर उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. कल्याण विधीत मार्लेश्वराची म्हणजेच नवरदेवाची मुर्ती (चांदीचे टोप) आंगवलीचे अणेराव यांनी मांडीवर घेतली होती. गिरीजामाईची मूर्ती लांजेकर स्वामी मांडीवर घेवून बसले होते. हा सर्व सोहळा बसून प्रथेप्रमाणे पार पडला. विवाह सोहळ्याचे पौराहित्य रायपाटणकर स्वामी, पाटगांवचे जंगम यांनी केले.हा विवाह सोहळा धार्मिक विधीनुसार मार्लेश्वर देवतेच्या गुहेसमोरील सभा मंडपात पार पडला. हा विधी पार पडत असताना गुहेतील देवतेला याचे दर्शन घडणे आवश्यक असते व याची यावेळीही काळजी घेण्यात आली होती. या सोहळ्यात मंगलाष्टका या पौराहित्य करणाऱ्यांनी म्हटल्या.

शेवटची मंगलाष्टका कल्याणविधी सोहळ्यासाठी उपस्थित मंडळींनी सामुहिक पणे म्हणून हा सोहळा यादगार केला. यानंतर शिव हरा रे शिव हरा, हर हर मार्लेश्वर, गिरीजा माते की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या सोहळ्यानंतर वधूवरांस आहेर देण्याचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यासाठी लाखो भाविक मारळनगरीत दाखल झाले होते. 

टॅग्स :TempleमंदिरRatnagiriरत्नागिरी