शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

कोयनेच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर कोकणासाठीच - रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 13:20 IST

समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्याअवजलाचा वापर कोकणाची भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी केला जाणार आहे.

दापोली - समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या अवजलाचा वापर कोकणाची भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी केला जाणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरवण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

पत्रकारांशी बोलताना कदम पुढे म्हणाले की, गेल्या चार वर्षापासून कोयनेच्या समुद्राकडे वाहुन जाणाऱ्या पाण्याचा उपयोग कोकणाचे नंदनवन होण्यासाठी करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करत होतो. मध्यंतरीच्या काळात कोयनेचे हे पाणी मुंबईकडे नेण्याचा घाटही घालण्यात आला होता. मात्र आपण त्याला तीव्र विरोध केला होता. काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण हा विषय पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.

सध्या राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने या योजनेच्या खर्चासाठी खास बाब म्हणून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी मागणी करण्यात यावी व या प्रस्तावाचा पाठपुरावा सचिवांनी करावा असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती कदम यांनी दिली. हे पाणी उचलल्यास कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. कोकणच्या विकासासाठी केंद्राकडे पाठविण्यात येणारा हा पहिलाच प्रस्ताव आहे, असेही ते म्हणाले.  

सीआरझेडबद्‌दल बोलताना ते म्हणाले की, पूर्वी किनारपट्‌टीच्या भरतीरेषेपासून 500 मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास सीआरझेड कायद्‌यामुळे परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे कोकणाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभूनही त्याचा उपयोग पर्यटनासाठी करता येत नव्हता व त्यामुळे कोकणचा विकास थांबला होता. 

आपण पर्यावरणविभागाचा कार्यभार स्वीकारल्यावर सीआरझेड कायद्‌यात शिथिलता आणण्यासाठी चार वर्षे केंद्र सरकारकडे जाऊन प्रयत्न केले. तेथील मंत्रालयात जाऊन ठाण मांडून बसलो त्यामुळे या कायद्‌यात शिथिलता आणण्यात आली. आता ही मर्यादा 50 मीटर अंतरापर्यंत कमी करण्यात आली आहे. यामुळे कोकणात आता पर्यटनवाढीसाठी विविध विकासकामे हाती घेता येणार असून आता कोकणचा विकास होण्यास निश्‍चित मदत होणार आहे. यामुळे कोकणातील तरुणांच्या हाताला गावातच काम मिळेल व मुंबईकडे जाणारा तरुणांचा लोंढा थांबविण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणkonkanकोकण