शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोरोनाच्या भीतीने आखाती नोकरदार परतीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 16:57 IST

कोरोना व्हायरसचा झपाट्याने होत असल्याने आखाती प्रदेशात नोकरीला गेलेल्या मंडळींवर नोकरीचे संकट उद्भवले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या भीतीने आखाती नोकरदार परतीच्या मार्गावरगेलेल्या मंडळींवर नोकरीचे संकट

रत्नागिरी : कोरोना व्हायरसचा झपाट्याने होत असल्याने आखाती प्रदेशात नोकरीला गेलेल्या मंडळींवर नोकरीचे संकट उद्भवले आहे.आखातील प्रदेशातच नव्हे; तर देश-विदेशातून परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे हॉटेल्स, लॉजिंग्स, वाहतूक व्यवसायावर परिणाम झाला आहे.

काम नसल्याने या क्षेत्रातील नोकरदारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. वाहन चालक, वेटर, शेप, गाईड, सफाई कामगार अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कित्येक मंडळींना कामच नसल्याने संबंधित कंपन्यांनी मायदेशी परत पाठविले आहे. सौदी अरेबिया, कुवेत, मस्कत, दुबई येथून कित्येक कोकणी मंडळी काम नसल्याने परत आली आहेत. परदेशातील काही कंपन्यांनी मात्र भारतात सुट्टीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने परत बोलावले आहे.

कोकणातील अनेक मंडळी आखाती प्रदेशात कार्यरत आहेत. परदेशातील मंडळी वर्षातून एक महिना भारतात सुट्टीवर येतात. त्यामुळे सुट्टीसाठी आलेल्या भारतीयांना ८ मार्चपर्यंत कामावर हजर होण्यासाठी तातडीची सूचना काढली आहे, अन्यथा नंतर येणाऱ्या मंडळींना भारतीय राजदुतावासांतर्गत वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र सादर करून हजर व्हावे लागेल, अशी सूचना केल्याने अनेक भारतीय नोकरीसाठी परदेशात परतीच्या मार्गाला लागले आहेत.

यामध्ये कोकणातील युवकांचाही समावेश आहे. अस्थैर्याचे हे संकट टाळण्यासाठी अनेकांनी सुट्टी अर्ध्यावर टाकून नोकरीच्या ठिकाणी जाण्याची तयारी केली आहे.मांसाहारावर परिणामकोरोना व्हायरसचा धसका रत्नागिरीकरांनीही घेतला आहे. त्यामुळे कित्येकांना चिकन खाणे बंद केले आहे. याचा परिणाम चायनीज विक्रेत्यांवर झाला आहे. चिकन विक्री करणाऱ्यांनी खप थांबल्याने दरच खाली आणले आहेत.

शहरातील ठिकठिकाणी चिकन विक्रेत्यांच्या दुकानात ३५ रूपये किलो दराने विक्री सुरू होती. जेमतेम १० टक्केच मंडळी चिकन खात आहेत. त्यामुळे दिवसाला १५० ते २०० किलो चिकन विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे व्यवसाय मंदावले आहेत. ग्राहकांची वाट पाहात विक्रेत्यांना दुकानात बसावे लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाKonkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी