शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

हाताच्या कुंचल्यातून साकारलेल्या रांगोळीने पाणावले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 5:59 PM

art, ratnagirinews ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

ठळक मुद्देहाताच्या कुंचल्यातून साकारलेल्या रांगोळीने पाणावले डोळेराहुल कळंबटेंकडून शहिदांना आदरांजली

अरुण आडिवरेकररत्नागिरी : ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.रत्नागिरी येथील कुणबी भवन येथे वर्धापन दिनानिमित्त राहुल कळंबटे यांनी ही रांगोळी रेखाटली आहे. गेली ११ वर्ष राहुल कळंबटे विविध प्रकारच्या रांगोळ्या रेखाटत आहेत. त्यात ८ वर्ष संस्कार भारती तर ३ वर्ष पोट्रेट रांगोळ्या साकारत आहेत. ज्वलंत विषयावर रांगोळी रेखाटण्याचा त्यांना जणू छंदच लागला आहे.कितीतरी कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील मौल्यवान जीव देशासाठी अर्पण केले आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, कुटुंबातील तरणाताठा मुलगा शहीद झाल्यावर त्याचा भाऊ किंवा एखाद्या कुटुंबातील पती देशासाठी हुतात्मा झाल्यावर त्यांची पत्नी मोठ्या अभिमानाने सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्यासाठी पुढे येत आहे.

तरुण मुलगा डोळ्यांसमोर अचानक शहीद झाल्याचे वृत्त धडकते तेव्हा कितीही झालं तरी पोटचा गोळा दुरावल्यावर त्याला जन्म देणाऱ्या त्याच्या मातेच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतातच. पण तरीही शहीद झालेला तो पुत्र आपल्या मातेला धीर देताना काय म्हणत असेल, असा हृदयस्पर्शी प्रसंग रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी आपल्या रांगोळीच्या अदाकारीतून हुबेहूब रेखाटला आहे.ही रांगोळी पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रशांत राजिवले आणि राजीव भातडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कळंबटे यांनी रांगोळी रेखाटण्याची कला अवगत केली आहे. शनिवारी राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या या रांगोळीने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला. 

चालू घडामोडींवर रांगोळी रेखाटायला अधिक आवडते. दोनच दिवसांपूर्वी सीमेवर लढणारे लढणारे जवान शहीद झाले. शहिदांप्रति असणारा आदर, त्यांच्याप्रति असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी ही रांगोळी रेखाटली. ही रांगोळी रेखाटताना त्या मातेच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून मनही दाटून येत होते. या रांगोळीच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.- राहुल कळंबटे

टॅग्स :artकलाRatnagiriरत्नागिरी