रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, महामंडळाकडील धरणांमध्ये आता केवळ ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने पाऊस न पडल्यास पाणीपुरवठा बंद करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.गेल्यावर्षी परतीचा पाऊस पुरेसा न झाल्याने बाष्पीभवनाने बंधाºयातील पाणीसाठा प्रचंड प्रमाणामध्ये कमी झाला. त्यावर पर्याय म्हणून महामंडळाने पाटबंधारे विभाग कुवारबाव यांच्याकडे त्यांच्या शिपोशी धरणातून तीन लाख घनमीटर पाण्याची मागणी केली होती. त्यासाठी १४ लाख ८३२ रुपये एवढी रक्कम एमआयडीसीने जमा केली. त्यानुसार ३ एप्रिल २०१९ पासून शिपोशी धरणातून पाणी सोडण्यात आले. पाणी हरचेरी येथील धरणामध्ये पोहोचण्यासाठी अंदाजे ३२ किलोमीटर अंतर पार करावे लागले.महामंडळाने उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याच्या दृष्टीने प्रथम २५ टक्के कपातीचे धोरण अवलंबिले. त्यानंतर साठा कमी होत गेल्यामुळे २ जून २०१९पासून अधिक २५ टक्के कपात करण्यात आली होती. ७ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु ठेवला. साठाच अल्प राहिल्याने अखेर १३ जूनपासून उर्वरित पाणी दोन दिवसाआड पुरविले जाऊ लागले. आता फक्त आठ दिवसाचा पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडला नाही तर पुरवठा शक्य होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.सहकार्याचे आवाहनपाणी पुरवठा बंद झाल्यास जनप्रक्षोभ निर्माण होण्याची शक्यता आहे. महामंडळाने पाणीपुरवठा करण्याकरीता आटोकाट प्रयत्न केले आहे तथापि परिस्थिती हाताबाहेर चालल्याने पाणीपुरवठा करणे अशक्य होईल. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पाऊस आला...एकिकडे एमआयडिसीने ८ दिवस पुरेल इतकाच पाणी साठा असल्याचे स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे बुधवारी सायंकाळपासून रत्नागिरी परिसरात दमदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे या पावसामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
आठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : पाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:56 IST
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र, महामंडळाकडील धरणांमध्ये आता केवळ ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने पाऊस न पडल्यास पाणीपुरवठा बंद करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.
आठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : पाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!
ठळक मुद्देआठ दिवसांपुरतेच पाणी शिल्लक : एमआयडीसी धरणांतील साठा संपलापाऊस न झाल्यास ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद!