शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

खेडमधील कोरोना सेंटरच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी; रुग्णांना सुरक्षितरित्या हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:26 IST

अतिमुसळधार पावसामुळे खेड शहरातील कोरोना सेंटरचा तळमजला पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे.

खेड: अतिमुसळधार पावसामुळे खेड शहरातील कोरोना सेंटरचा तळमजला पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. या कोरोना सेंटरमधील ऑक्सिजन लावलेले ३५ रुग्ण बुधवारी रात्रीच कळंबणी रुग्णालयात हलवण्यात आले असून, ऑक्सिजन न लावलेले ४५ रुग्ण दुसऱ्या मजल्यावर आहेत. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. खेडमध्ये जगबुडी नदीच्या जुन्या पुलावरुन पाणी जात आहे.

बुधवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे खेड शहरात पूर आला आहे. रात्री पाण्याचे प्रमाण वाढू लागताच, व्यापारी आणि सर्व यंत्रणांनी धावपळ सुरू केली. खेड शहरातच शिवतेज आरोग्य संस्थेमध्ये शासकीय कोविड केअर सेंटर आहे. तेथे एकूण ८० रुग्ण होते. त्यातील ३५ जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. हे रुग्ण तळमजल्यावर होते. पाणी वाढू लागताच या रुग्णांना तातडीने कळंबणी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. अन्य ४५ रुग्णांना रुग्णांना दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे.

सकाळपर्यंत पाणी वाढत जाऊन तळमजला पूर्ण पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या सर्वव रुग्णांना दुस-या मजल्यावर ठेवण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. वैद्यकीय यंत्रणा त्यांच्यासोबत तेथेच आहे. त्यांच्या मदतीसाठी नगर परिषदेकडून एक बोट तैनात करण्यात आली आहे. गरजेच्या गोष्टी बोटीतून तेथे नेऊन दिल्या जात आहेत.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाRainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्याKhedखेड