शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत एमआयडीसीकडून पुन्हा पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:13 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात तिसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत एमआयडीसीकडून पुन्हा पाणीकपातपाणीपुरवठा नाईलाजास्तव बंद होण्याची शक्यता

रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात तिसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे.महामंडळाची पाणी साठ्याची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाच्या शिपोशी येथील धरणातून पाणी घेण्यात आले. परंतु सध्या शिपोशी धरणातील पाणीसाठाही संपुष्टात आला आहे. महामंडळाच्या बंधाऱ्यातील पाणीसाठासुध्दा अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे उपाय योजना म्हणून महामंडळाने यापूर्वी १३ मे २०१९ पासून पाणी पुरवठ्यामध्ये २५ टक्के कपात केली होती.सध्याचा अल्प पाणीसाठा लक्षात घेऊन व पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता ओळखून महामंडळाकडून २ जून २०१९ पासून आणखी २५ टक्के पाणी कपात केली. धरणातील अल्प पाणीसाठा व पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता यामुळे ७ जूनपासून महामंडळाने धरणातील पाणीसाठा संपेपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण अवलंबले होते.सद्यस्थितीत पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने व पाऊस लांबणीवर जाण्याच्या शक्यतेमुळे १३ जून २०१९ पासून महामंडळ धरणातील पाणीसाठा संपेपर्यंत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणार आहे. भविष्यात धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा नाईलाजास्तव बंद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMIDCएमआयडीसीRatnagiriरत्नागिरी