शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या संधीला आता मतदारच कंटाळले,नव्यांची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:14 IST

Elecation Ratnagiri -आता एक शेवटची संधी द्या, असे म्हणत वर्षानुवर्षे राजकीय बस्तान मांडणाऱ्या उमेदवारांना आता मतदारही कंटाळले आहेत. वर्षानुवर्षे निवडणूक म्हणजे आपलीच खोतकी असल्याचे समजणाऱ्यांना मतदारांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न करत अहो दादा, भाई, मामा, आबा आता तरी थांबा, असे म्हणण्याची वेळ रत्नागिरी शहरानजीकच्या एका ग्रामपंचायत हद्दीत आली आहे.

ठळक मुद्दे वर्षानुवर्षांच्या खोतकीला विरोध, ग्रामपंचायत निवडणूक रंगात नवीन उमेदवारांना संधी मिळत नसल्याची खंत, लोकप्रतिनिधीही नव्यांना डावलतात 

रत्नागिरी : आता एक शेवटची संधी द्या, असे म्हणत वर्षानुवर्षे राजकीय बस्तान मांडणाऱ्या उमेदवारांना आता मतदारही कंटाळले आहेत. वर्षानुवर्षे निवडणूक म्हणजे आपलीच खोतकी असल्याचे समजणाऱ्यांना मतदारांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न करत अहो दादा, भाई, मामा, आबा आता तरी थांबा, असे म्हणण्याची वेळ रत्नागिरी शहरानजीकच्या एका ग्रामपंचायत हद्दीत आली आहे.ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा होताच अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. रत्नागिरी शहरानजीकच्या शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. तालुक्यातील उमेदवारांची अंतिम यादी शिवसेनेतील वजनदार लोकप्रतिनिधी ठरविणार असल्याने त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी कधी रत्नागिरीत तर कधी त्यांच्या घरापर्यंत जाऊन उमेदवारीसाठी विनंत्या करत आहेत.शहरानजीकच्या या ग्रामपंचायत निवडणुकीत वर्षानुवर्षे तेच उमेदवार उभे राहात असल्याने नव्यांना संधी मिळत नाही. ग्रामपंचायतीपासून निवडणूक रिंगणात उभे राहणारे पुढे आमदार, खासदार होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, याठिकाणी चक्क उलटा प्रवास सुरू असून, एक शेवटची संधी द्या म्हणत अनेकांनी बस्तान मांडले आहे. तर काहीजण पुढच्यावेळी दुसऱ्याला संधी देऊ, असा शब्द देऊनही पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यातच वरिष्ठ स्तरावर नेहमीच्याच चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याने नेमके काय गौडबंगाल आहे, याची चर्चा रंगत आहे. गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत निवडणुकीला आपली खोतकी समजणाऱ्यांना आता तरी थांबा म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे....तर बहिष्कार टाकूग्रामपंचायत हद्दीतील एका प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, गेल्या १५ वर्षात येथील स्थानिकांना संधी दिलेली नाही. यावेळी येथील ग्रामस्थांनी स्थानिकच उमेदवार हवा, असे सांगितले आहे. गावातील उमेदवार न दिल्यास निवडणुकीवरच बहिष्कार टाकू, असा इशारा दिला आहे.केवळ स्वत:च्या फायद्यासाठीच सदस्यत्वग्रामपंचायतीचा सदस्य होऊन ग्रामपंचायतीच्या निधीतून आपली पोळी भाजून घेण्याचा काहींना सपाटाच लावला आहे. त्यामुळे निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अजून किती वर्ष संधी द्यायची, असा प्रश्न करत त्याच प्रभागात अन्य एकाने उमेदवारी मागितल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण