शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङ्मयीन पुरस्कार

By admin | Updated: November 13, 2015 23:45 IST

कोमसापचे संमेलन : मुंबई येथील राजा शिवछत्रपती विद्यालयात २२ रोजी वितरण सोहळा

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील साहित्यिकांना विविध वाङ्यीन पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या वाङ्मयीन १५ पुरस्कारांची घोषणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.कोमसाप पुरस्कारांचे वितरण दादर (मुंबई) येथील राजा शिवछत्रपती विद्यालयात २२ रोजी होणाऱ्या संमेलनात होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व द्वितीय क्रमांकाचे विशेष पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. कादंबरीसाठी देण्यात येणारा र. वा. दिघे स्मृती पुरस्कार अशोक समेळ यांना ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ कादंबरीसाठी जाहीर झाला आहे. तसेच वि. वा. हडप स्मृती विशेष कादंबरी पुरस्कार प्रा. चंद्रकांत मढवी ‘उधळ्या’ यांना देण्यात येणार आहे. कथासंग्रहासाठी वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार स्टीफन परेरा ‘पोपटी स्वप्न’ यांना, तर विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार मनीष पाटील यांना ‘माह्यावाल्या गोष्टी’ कथासंग्रहासाठी देण्यात येणार आहे.कवितेकरिता आरती प्रभू स्मृती पुरस्कार शशिकांत तिरोडकर यांना ‘शशिबिंंब’, तर वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार रेखा कोरे ‘वास्तवाच्या उंबरठ्यावर’ कवितासंग्रहासाठी जाहीर झाला आहे. चरित्र आत्मचरित्र प्रकारात धनंजय कीर स्मृती पुरस्कार मोहन गोरे यांना ‘आनंदयात्रा’ तसेच श्रीकांत शेट्ये स्मृती विशेष पुरस्कार डॉ. भगवान कुलकर्णी- ‘आॅनरेबली अ‍ॅक्वीटेट’ यांना देण्यात येणार आहे. ललित गद्यातील अनंत काणेकर स्मृती पुरस्कार नीला सत्यनारायण यांना ‘टाकीचे घाव’, तर लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार रेखा नार्वेकर यांना ‘आनंदतरंग’साठी देण्यात येणार आहे. बालवाङ्मय प्रकारातील प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार डॉ. विद्याधर करंदीकर यांना ‘नाथ पै असाही एक लोकनेता’साठी देण्यात येणार आहे. संकीर्ण वाङ्मय प्रकारात वि. कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार गोपीनाथ सावंत ‘झाकोळलेले प्राचीन कोकण’ यांना तसेच अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार विद्या जोशी यांना ‘आरोग्यासाठी मनाचे श्लोक’साठी दिला जाणार आहे. दृकश्राव्य कला, सिनेमा प्रकारातील भाई भगत स्मृती पुरस्कार दिवाकर गंधे यांना ‘चित्रगंध’साठी, तर नाटक एकांकिका प्रकारासाठी रमेश कीर पुरस्कार- विनोद पितळे ‘बाय द वे’करिता दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)पुरस्कार समितीचे निमंत्रक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण नेरूरकर यांनी सर्व पुरस्कारांची घोषणा केली. दरवर्षी कोमसापतर्फे समीक्षा ग्रंथासाठी प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार देण्यात येतो. मात्र, यावर्षी स्पर्धेत योग्य पुस्तक आले नसल्यामुळे हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नसल्याचे कोमसापतर्फे सांगण्यात आले आहे.