शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत होणार महासदाशिवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 15:18 IST

गेले ४४ वर्षे माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरीतील मारुती कॉमन क्लबची यावर्षीची श्री गणेशाची मूर्ती अत्यंत वेगळी आणि पुराणामध्ये स्वत:चे महत्त्व जपणारी अशी आहे.

ठळक मुद्दे माघी गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी प्रतिष्ठापना मारूती कॉमन क्लबतर्फे विविध कार्यक्रम

रत्नागिरी : गेले ४४ वर्षे माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरीतील मारुती कॉमन क्लबची यावर्षीची श्री गणेशाची मूर्ती अत्यंत वेगळी आणि पुराणामध्ये स्वत:चे महत्त्व जपणारी अशी आहे.

महासदाशिव असे हे श्री गणेशाचे रूप रत्नागिरीतील मूर्तिकार सुशील कोतवडेकर यांच्या हस्तकौशल्यातून साकारली आहे. मंगळवार, २८ जानेवारी रोजी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.मारूती कॉमन क्लबच्या उत्सवात असलेली श्रींची मूर्ती अत्यंत वेगळी आणि चित्ताकर्षक आहे. २५ मुखं आणि ५० हात असलेली ही श्रींची मूर्ती पाहताक्षणी आपल्या मनात अनेकविध प्रश्न उपस्थित करते.

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार ही मूळ महासदाशिवाची मूर्ती आहे. हा शंकर कैलास पर्वतात वसलेला असून, याला २५ मुखं आणि ५० हात आहेत. म्हणून त्याला ह्यमहासदाशिवह्ण म्हणतात. त्याचबरोबर याच्या आजूबाजूला कैलास पर्वतामध्ये अजून निरनिराळ्या २५ मूर्ती आहेत. रुथरास, सिद्धास, साजे हे तिघे त्या महासदाशिव मूर्तीची पूजा करतात.पुराणातून असे समजते की, हा २५ मुखी सदाशिव कैलासात आहे. तो आपले आशीर्वाद सगळ्या जीवांना दानाच्या स्वरूपात देतो, म्हणून त्याला अनुग्रह मूर्ती असेही म्हणतात. अजूनही या मूर्तीचा आकार-उकार समजला नाहिये. मूर्तीचे शरीर अनेक प्रकार एकत्र येऊन तयार झाले आहे. या महासदाशिवाची पूजा केली जाते ती कांचीपूरममध्ये.

या महासदाशिवाची मूर्ती कोणत्याही मंदिरात नसून ती तामिळनाडू राज्यातील जिल्हा कन्याकुमारी येथील सुचिंद्रम पंचायत शहरातील सुरांगरेश्वर या मंदिराच्या गोपुरावर आहे. अशाच अनेक मंदिरांच्या गोपुरावर हा सदाशिव आहे. असे मानतात की, याची पूजा-अर्चा केली की हा महासदाशिव प्रसन्न होतो. खूप ताप असल्यावर या महासदाशिवाला ऊसाच्या रसाचा अभिषेक केल्याने ताप कमी होतो, असेही सांगण्यात येते.या २५ मुखी श्री गणेशाचा उत्सव मंगळवार दि. २८ जानेवारीपासून सुरू होत असून, रत्नागिरीतील खालची आळी येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ratnagiriरत्नागिरी