शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निर्दोष सुटल्यानंतर मनाई आदेशाचा भंग, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:53 IST

न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर मुन्ना देसाईसह ११ संशयितांना रत्नागिरीच्या कारागृहातून हातखंबा येथे परत नेले जात होते. मात्र, मारूती मंदिरच्या पुढे बॅँक आॅफ इंडियासमोरील रस्त्यावर रॅली काढून वाहने धोकादायकरित्या हाकली.

ठळक मुद्देनिर्दोष सुटल्यानंतर मनाई आदेशाचा भंग३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर मुन्ना देसाईसह ११ संशयितांना रत्नागिरीच्या कारागृहातून हातखंबा येथे परत नेले जात होते. मात्र, मारूती मंदिरच्या पुढे बॅँक आॅफ इंडियासमोरील रस्त्यावर रॅली काढून वाहने धोकादायकरित्या हाकली.

ओरडून किंचाळून दहशत निर्माण होईल, असे वातावरण तयार केले तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केला, असे पोलिसांना ध्वनीचित्रफीतीमध्ये आढळले. याप्रकरणी मुन्ना देसाई, महेश तथा बाबू म्हाप व सागर म्हापुसकर यांच्यासह ३० ते ४० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश अरविंद कुबडे (रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. २१ आॅगस्ट रोजी मुन्ना देसाईसह ११ जणांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांची सुटका होणार असल्याने कारागृहाबाहेर गर्दी जमली होती. त्यासंदर्भात गोपनीय सुत्रांकडून पोलिसांना व्हिडिओ क्लीप मिळाली. त्यात वाहनांमध्ये धोकादायक पद्धतीने बसून धोकादायक स्थितीत वाहने चालविल्याचे दिसले.

तसेच गाड्यांचे इंडिकेटर, हेडलाईट्स लावून हॉर्नही जोरजोरात वाजविण्यात आले. वाहतुकीला अडथळा निर्माण करून रॅली काढली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी ४० जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम १४३, १४९, २७९, ३३६, महाराष्ट्र  पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)चा भंग, तसेच १३५, ११०, ११२,/११७, मोटारवाहन कायदा कलम १८४, ६६ / १९२, १२२ / १७७, १२३ (१) (२) / १७७, १९० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस