शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी गाव सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:05 IST

accident Ratnagiri- गाव करील ते राव न करील ही म्हण सार्थ ठरवत हातखंबा आणि झरेवाडी येथील ग्रामस्थ अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

ठळक मुद्देअपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी गाव सरसावलेआर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ऋतुजा यांना मदतीची गरज

हातखंबा : गाव करील ते राव न करील ही म्हण सार्थ ठरवत हातखंबा आणि झरेवाडी येथील ग्रामस्थ अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा गावामध्ये दि. २७ रोजी एका मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झरेवाडी येथील मोटारसायकलस्वार राजेश धुमक या तरूणाचा जागीच मृत्यु झाला होता. त्याचा मुलगा साहिश (६) याला व त्याची आई ऋतुजा धुमक हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोघांना अधिक उपचाराकरिता कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच साहिश याचा मृत्यू झाला.ऋतुजा धुमक या गंभीर जखमी झाल्याने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातग्रस्त दाम्पत्याच्या घरी वृध्द आई-वडील आहेत. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ऋतुजा यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे हातखंबा व झरेवाडी येथील अनेकांनी घरोघरी जाऊन निधी गोळा केला आहे. धुमक कुटुंबाच्या मदतीसाठी सर्वजण फिरत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी