शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

cyclone : निसर्ग चक्रीवादळामुळे पर्यटकांचे खास आकर्षण असलेले गाव संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:25 IST

हिरवीगर्द झाडी, सुंदर सागरी किनारा आणि नारळी पोफळीच्या बागा असे चित्रात आणि कथा कवितांमध्ये उल्लेख असलेल्या कासवांचे गाव वेळासचे आज रूपच पालटले आहे. निसर्गाने भरभरुन दिलेल्या वेळासकरांना आज निसर्गानेच मारले आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळामुळे पर्यटकांचे खास आकर्षण असलेले गाव संकटातवेळास गाव ५० वर्षे आणखीन मागे, निसर्गाने भरभरून दिले अन् सारे हिरावून नेले

मंडणगड : हिरवीगर्द झाडी, सुंदर सागरी किनारा आणि नारळी पोफळीच्या बागा असे चित्रात आणि कथा कवितांमध्ये उल्लेख असलेल्या कासवांचे गाव वेळासचे आज रूपच पालटले आहे. निसर्गाने भरभरुन दिलेल्या वेळासकरांना आज निसर्गानेच मारले आहे.निसर्ग चक्रीवादळात निसर्गरम्य वेळास गावचे रूपच पालटले आहे. इथली बागायत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. नारळी, पोफळी, आंबा, रातांबा, फणस व मसाल्यांची झाडे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तीन तासांकरिता आलेल्या या वादळाने वेळासकरांना ५० वर्षांहून अधिक मागे नेवून ठेवले आहे.

हजारो लागती झाडे या वादळात गवताप्रमाणे उखडून गेली आहेत. घर संसाराचे नुकसान झाले आहे. एकवेळ घराचे झालेले नुकसान पचवता येईल पण वाडीचे नाही, अशी स्थिती आज इथल्या प्रत्येक ग्रामस्थाची झालेली आहे. एका बाजूला डोंगर, तर दुसरीकडे समुद्र यामुळे मर्यादित जागा असूनही बागायती फुलवलेल्या वेळासकरांना आता पुढे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे.याआधी सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी या गावात समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरले होते. यामुळे गावातील दांडा परिसरातील अनेक गावे उधाणच्या आहारी गेली होती. मोठ्या प्रमाणात हानी व घरांचे नुकसान झाले होते. आता निसर्गाच्या प्रकोपामुळे वेळास गाव पूर्णपणे नेस्तनाबूत झाले आहे.कासवांचे गाव म्हणून ओळखवेळास गावची आणखी एक ओळख म्हणजे हे गाव कासवांचे प्रजननस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. कासव येत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील सुरुची बने वादळामुळे नष्ट झाली आहेत. वादळामुळे कासवांच्या विणी हंगामाला फटका बसू शकतो. तसे झाल्यास वेळास गावच्या पर्यटन विकासावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. या परिसरात असणाऱ्या समुद्र घारी आणि काही दुर्मीळ पक्षी (गरुड) प्रजातींच्या घरट्यांवरही निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे.ऐतिहासिक वारसापेशव्यांच्या दरबारातील ह्यनानाह्ण हे मूळचे वेळास गावचेच. एका बाजूने अरबी समुद्र, तर दुसरीकडे बाणकोटचा किल्ला. नारळी-पोफळीच्या वडिलोपार्जित बागा, असा डौल या वेळास गावचा होता. दोन अडीचशे घरे असलेले हजार बाराशे लोकवस्तीचे हे वेळास गाव. नाना फडणवीस यांच्या वारशाने हे गाव आजही ओळखले जात आहे.कोरोनाचाही विसरतालुक्यातील कमावता मोठा वर्ग मुंबईमध्ये रोजगाराला आहे. त्यामुळे गावातील घरे बंद आहेत. वादळामुळे बंद घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून तालुक्यात चाकरमानी मोठ्या संख्येने परत येत आहेत. ही सर्व मंडळी कोरोनाला विसरुन आपापली घरे स्थानिकांच्या मदतीने दुरुस्त करुन घेण्यात गुंतलेली आहेत. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरी