शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

gram panchayat election: ग्रामपंचायत निवडणुकीत गावपॅनल ‘बॅकफुटवर’, मतदार संभ्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 18:54 IST

विकास कामात राजकारण नको? गावचा विकास महत्त्वाचा? गावच्या विकासात राजकारण्यांना वेशीबाहेर ठेवू या? या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहिल्या आहेत.

प्रशांत सुर्वेमंडणगड : मंडणगड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका  १८ डिसेंबर २०२२ रोजी होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी दुरंगी लढत पाहायला मिळत आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय असणारे गावपॅनल राजकारणाच्या गर्तेत ‘बॅकफुट’वर राहिले आहे.राज्यातील राजकारणाचे बदलते समीकरण पाहता ग्रामीण भागातील मतदार संभ्रमित आहेत. निवडणुकीत मात्र वाडीवाडीवर बैठका होऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास  आघाडी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) अशी समोरासमोरील थेट दुरंगी लढत होत आहे. गावच्या विकासाकरिता पक्षविरही राजकारण करू या? विकास कामात राजकारण नको? गावचा विकास महत्त्वाचा? गावच्या विकासात राजकारण्यांना वेशीबाहेर ठेवू या? या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहिल्या आहेत.गावागावांमध्ये गटातटाचे राजकारण शिरलेले दिसत आहे. जनतेमधून थेट सरपंच निवडीमुळे पक्षाचा झेंडा महत्त्वाचा बनला आहे. ग्रामीण भागात  ‘गावचा विकास तर पक्षाचा झेंडा हमखास’ असाच प्रचार हाेत आहे. बदलत्या राजकारणात गावपॅनलही गावाबाहेरच राहिले आहे.कधी रात्री तर कधी पहाटे अर्ज भरणानिवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज भरणे व त्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवताना कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले होते. वेबसाईट नीट चालत नाही, सर्व्हर डाऊन, इंटरनेट जाणे त्याचबरोबर अटींची परिपूर्ण माहिती भरेपर्यंत असंख्य अडचणींना पार करणे निवडणुकीपेक्षा कठीण बनले होते. सर्व्हर डाउन यामुळे काही जणांनी रात्री १२ नंतर अर्ज भरले तर अनेक जण पहाटे ४ वाजल्यापासून अर्ज भरत होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक