लोटे येथे मद्यसाठ्यासह गावठी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:31 IST2021-05-14T04:31:41+5:302021-05-14T04:31:41+5:30

खेड : तालुक्यातील लोटे माळवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू व विनापरवाना देशी-विदेशी मद्यसाठा विक्री व बाळगल्याप्रकरणी लोटे पोलिसांनी ...

Village liquor confiscated with liquor at Lotte | लोटे येथे मद्यसाठ्यासह गावठी दारू जप्त

लोटे येथे मद्यसाठ्यासह गावठी दारू जप्त

खेड : तालुक्यातील लोटे माळवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू व विनापरवाना देशी-विदेशी मद्यसाठा विक्री व बाळगल्याप्रकरणी लोटे पोलिसांनी मंगळवारी ११ मे रोजी सायंकाळी ५.४५ मिनिटांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास माळवाडी लोटे येथे टाकलेल्या धाडीत सनी संजय नलावडे (२९, रा़ माळवाडी, लोटे) हा देशी, विदेशी व गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे विकताना आढळला. यावेळी पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये ६० लिटर गावठी हात भट्टची दारू, ३,६६० रुपये किमतीच्या विदेशी इंपेरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या २४ काचेच्या सीलबंद बाटल्या व १,२४८ रुपयांची देशीदारू टॅगो पंचच्या १८० मिलीच्या २४ प्लास्टिक सीलबंद बाटल्या असा एकूण ७,८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रुपेश जोगी यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली़ अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.

Web Title: Village liquor confiscated with liquor at Lotte