शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पशुवैद्यकीय खात्याची अवस्था बिकट

By admin | Updated: September 17, 2016 23:59 IST

गुहागर तालुका : अपुऱ्या अधिकारी संख्येमुळे अडचणी; पशुसंवर्धन खात्याकडे दुर्लक्ष

असगोली : भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतीपूरक उद्योग म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. त्यामुळे या विभागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाने स्वतंत्र पशुसंवर्धन खाते निर्माण केले. परंतु, सुरुवातीपासूनच या खात्याला कायम दुय्यम दर्जा देण्यात आल्याने या खात्याचा कारभार गतीमान होण्याऐवजी तो मंद झाला. शासनानेही पशुसंवर्धन खात्याला अत्यावश्यक सोईसुविधा पुरविण्याबाबत सतत आखडता हात घेतला. त्यामुळे आज या खात्यामधील महत्त्वाच्या पशुधन अधिकारी तसेच पर्यवेक्षकांसह अनेक पदांवरील जागा रिक्त असल्याने पशुधनाचा विकास खुंटल्याचे चित्र आहे. गुहागर तालुक्याचा विचार केल्यास या ग्रामीण भागात पशुसंवर्धन खात्यासाठी राज्य शासनाकडून पूर्वी सेवेचे चांगले जाळे विणण्यात आल्याची नोंद मिळते. त्यामध्ये पंचायत समिती कार्यालयात स्वतंत्र विभाग व स्वतंत्र कार्यालय तयार करुन त्यामध्ये तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) या जागेवरील १ अधिकारी व त्यांच्या हाताखाली आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर एकूण १५ पदे या खात्यासाठी मंजूर आहेत. परंतु, राज्य शासनाच्या गेल्या काही वर्षातील अनुत्साही धोरणामुळे या खात्यात नवी भरती करण्यात आली. त्यामुळे आज या खात्यामधील अनेक महत्त्वाची पदे आज रिक्त आहेत. या खात्याची सद्यस्थिती पाहिल्यास यामधील पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे प्रमुख पद रिक्त आहे. तसेच गुहागर, हेदवी, शृंगारतळी, पडवे व कारुळ या पाच जागांपैकी गुहागर, हेदवी व शृंगारतळी या तीन जागांवरील जिल्हा परिषदेतर्फे नेमण्यात आलेले पशुधन विकास अधिकारी हे पद रिक्त आहे. तर कोतळूक, वेळंब, आबलोली, शिवणे, अडूर, पालशेत, गिमवी, पवारसाखरी, तळवली व पिंपर या दहा जागांपैकी केवळ अडूर आणि गिमवी या दोन ठिकाणीच राज्य शासनातर्फे नेमणूक केलेले पशुधन पर्यवेक्षक कार्यरत आहेत. तर उर्वरीत ८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण १६ जागांपैकी ५ जागीच पशुधन विकास किंवा पशुधन पर्यवेक्षक अधिकारी कार्यरत असल्याने त्यामधील एका अधिकाऱ्याला पंचायत समितीच्या तालुका पशुधन विकास अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळावा लागत आहे. तर उर्वरीत चार अधिकाऱ्यांना तालुक्यातील उर्वरीत ११ पदांवरील अतिरिक्त कामकाज सांभाळण्याची वेळ आली आहे. एका अधिकाऱ्याला दोन-तीन ठिकाणांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे नियमित कामापेक्षा अधिकचे काम करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. या अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क होईल त्याप्रमाणे गावोगावी शेतकऱ्यांच्या घरी किंवा शेतामध्ये जावून जनावरांची तपासणी व इलाज करावा लागत आहे. तसेच कार्यालयीन कागदी घोडेही नाचवावे लागत असल्याने सर्वांच्याच नाकीनऊ आले आहे. (वार्ताहर)या खात्यामध्ये गावोगावी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना अन्य शासकीय खात्यांप्रमाणे सुसज्ज हेडक्वार्टर, कार्यालय, सहाय्यक लिपीक, शिपाई व अन्य सोयीसुविधा नाहीत. गुहागर तालुक्यातील १० पशुवैद्यकीय केंद्रात परिचराच्या जागा मंजूर असताना केवळ एका ठिकाणी परिचर भरण्यात आला आहे तर उर्वरीत ९ ठिकाणच्या जागा रिक्तच आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी गेल्यावर खोली उघडून तिची साफसफाई करावी लागते. अन्य शासकीय कार्यालयांप्रमाणे कुठल्याही सोईसुविधा उपलब्ध नसल्याने या अधिकाऱ्यांना गरीब शेतकऱ्यांच्या जनावरांना डोळ्यासमोर ठेवून नि:स्वार्थी भावनेने काम करावे लागते.शासनाने २००८ साली नवा अध्यादेश काढून पदविकाधारक पशुधन विकास पर्यवेक्षकांना पशुपक्षांवर शस्त्रक्रिया व गंभीर इलाज करण्यास मज्जाव केला. त्यांना कृत्रिम रेतन व जुजबी बायो उपचारांव्यतिरिक्त अन्य महत्त्वाच्या सेवांचे ज्ञान असूनही त्याचा वापर त्यांना करता येत नाही. त्यामुळे जखमी झालेल्या एखाद्या जनावरांवर इलाज करण्याचे अधिकार त्यांना नाहीत. जर सेवाभावी वृत्तीने एखाद्या अधिकाऱ्याने त्या जनावरावर इलाज केला आणि दुर्दैवाने ते जनावर दगावले तर होणाऱ्या तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन दंड व कैदेची तरतूदही कायद्यामध्ये केल्याने पशुसंवर्धन खात्यामधील पशुधन विकास पर्यवेक्षकांनी करावे तरी काय? असा गंभीर प्रश्न या खात्यामधील अधिकाऱ्यांसमोर उभा आहे.