शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी, चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी; नागरिक, व्यापारी धास्तावले

By संदीप बांद्रे | Updated: July 25, 2023 15:32 IST

भरतीमुळे आणखी काही प्रमाणात पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे 

चिपळूण : मागील आठवड्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सोमवारी रात्रीपासून येथे मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता बाजारपेठेतील काही भागात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. भरतीमुळे आणखी काही प्रमाणात पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.      शहर आणि ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. रात्रभर पाऊस पडत राहिला. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर अधिक वाढला आणि वाशिष्ठीसह शिवनदीने देखील इशारा पातळी ओलांडली. बघता बघता बाजारपुल व नाईक कंपनी परिसरात पुराचे पाणी शिरले. याशिवाय लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व अनंत आईस फॅक्टरी परिसरातही पाणी आले आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग व नागरिक पुराच्या भीतीने पुन्हा एकदा धास्तावले आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर प्रांताधिकारी आकाश निगाडे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे हे स्वतः जातिनिशी लक्ष देऊन आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही सतर्क केले आहे. परंतु सकाळी 11 वाजेपर्यंत असलेली पाणी पातळी ओहटीमुळे हळूहळू कमी होत आहे. वाशिष्ठी व शिवनदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही, त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी भाबरून जाण्याची गरज नाही. सायंकाळी ४ नंतर भरती असल्याने प्रशासन त्यावरही लक्ष ठेवून राहणार आहे. तसेच एनडीआरएफचे पथक सज्ज असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूरChiplunचिपळुण