शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा वैशाली मांजरेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 18:56 IST

दोन वेळा नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांच्याच नावावर आहे.

राजापूर  : राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा वैशाली विजय मांजरेकर यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने राहते घरी निधन झाले. त्या ५५ वर्षाच्या होत्या. मांजरेकर यांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र आज, शुक्रवारी दुपारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यातच त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. काही महिन्यांपुर्वीच त्यांचे पती विजय मांजरेकर यांचेही निधन झाले होते.एक शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून त्या परिचित होत्या. पतीच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत मांजरेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या असलेल्या मांजरेकर यांनी दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम केले होते. या काळात दोन वेळा नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. राजापूर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांच्याच नावावर आहे.त्या पहिल्यांदा २१ जुलै २००१ ते १६ डिसेंबर २००१ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी पहिल्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. नगर परिषदेच्या स्थापनेनंतर त्या पहिल्या महिला नगराध्यक्ष ठरल्या. त्यानंतर पुन्हा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना २३ डिसेंंबर २०११ ते ७ मार्च २०१३ या कालावधीत नगराध्यक्षपद भुषविण्याचा बहुमान मिळाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुर