एकाच दिवशी संगमेश्वरात १४० जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:56+5:302021-04-17T04:31:56+5:30

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव (कोंडकदम) ग्रामपंचायतीने गाव कोरोनामुक्तच रहावा, यासाठी संपूर्ण गावाचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लसीबाबत ...

Vaccination of 140 people in Sangameshwar on the same day | एकाच दिवशी संगमेश्वरात १४० जणांचे लसीकरण

एकाच दिवशी संगमेश्वरात १४० जणांचे लसीकरण

Next

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव (कोंडकदम) ग्रामपंचायतीने गाव कोरोनामुक्तच रहावा, यासाठी संपूर्ण गावाचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लसीबाबत असलेले गैरसमज दूर करून घेत ग्रामस्थांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. एकाच दिवशी १४० जणांचे लसीकरण करून घेतले आहे.

गावच्या सरपंच माधवी प्रमोद अधटराव अणि उपसरपंच रूपेश माने यांच्या नेतृत्वाखाली तुळसणी उपकेंद्रात ४५ वर्षांवरील तब्बल १४० ग्रामस्थांनी लसीकरण करून घेतले. असा उपक्रम करणारी आंबव ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

विशेष म्हणजे यासाठी आंबव ते तुळसणी ये-जा करण्यासाठी ग्रामपंचायतीने वाहने उपलब्ध करून दिली. वयोवृद्ध ग्रामस्थांची चहा-नाश्त्याची सोयही करण्यात आली होती. शारीरिक अंतर राखून व कोविडचे सर्व नियम पाळून हा उपक्रम करण्यात आला. यासाठी तुळसणी उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनीही सहकार्य केले.

Web Title: Vaccination of 140 people in Sangameshwar on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.