शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
3
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
4
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
5
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
6
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
7
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
8
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
9
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
10
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
11
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
12
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
13
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
14
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
15
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
16
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
17
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
18
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
19
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
20
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण

रामदास कदम यांच्या भूमिकेनंतर खेडमध्ये उद्या तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 19:11 IST

गेल्या अडीच वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेले रामदास कदम यांची दुसरी राजकीय इनिंग सुरू होणार का, याची उत्सुकता

खेड : शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत हालचाली वाढल्या आहेत. रामदास कदम यांच्या भूमिकेमुळे खेड तालुक्यात उलथापालथ हाेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुका पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक लावण्यात आली आहे.खेडमध्ये तालुका शिवसेनेची बैठक उद्या, शनिवारी (दि. २३) जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी भरणे येथील हॉटेल बीसूमध्ये दुपारी १२.३० वाजता आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना दिले आहे.रामदास कदम यांची पक्षाने हकालपट्टी केल्याचे पडसाद खेड तालुक्यात उमटणार आहेत. हकालपट्टीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नेतेपदी निवड केली. आगामी कालावधीत रामदास कदम कोकणात जोरदार शक्तिप्रदर्शन करतील, असे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे कदम यांना रोखण्यासाठी काही जुने शिवसैनिक व्यूहरचना आखत आहेत.रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना आगामी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिवसैनिकांना संबोधित करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोकणातील शिवसेनेत हालचालींना वेग आला असून, रामदास कदम राज्य दौऱ्याची सुरुवात कोकणातून करण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत दापोली विधानसभा मतदारसंघात थेट जनतेशी संवाद साधला हाेता.रामदास कदम यांनी राजीनामा देताच एक जुना शिवसैनिकांचा गट त्यांना रोखण्यासाठी पुढे येत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेले रामदास कदम यांची दुसरी राजकीय इनिंग सुरू होणार का, याची उत्सुकता सर्वांना आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदम