शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

फवारणी पंपांची अनावश्यक खरेदी

By admin | Updated: April 7, 2015 01:11 IST

कृषी विभाग : शेतीपंप, रक्षक सापळ्यांपाठोपाठ आणखी एक गैरव्यवहार; नाल दिला, घोडा कुठाय?

रत्नागिरी : फवारणी पंपाची अनावश्यक खरेदी करून ८०० शेतीपंप थेट तालुका कृषी कार्यालयाकडे वितरीत करण्यात आले आहेत. फवारणी पंप सुरू करण्यासाठी लागणारे दोन अश्वशक्तीचे मशीन मात्र शेतकऱ्यांना खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने ‘नाल देऊ केला आहे, मात्र घोडा शेतकऱ्यांना खरेदी करावा लागणार आहे’, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. पाच अश्वशक्तीचे ११९८ शेतीपंप तसेच रक्षक सापळ्याबरोबर अनावश्यक ८०० फवारणी पंपांची थेट खरेदी करून शेतकऱ्यांच्या माथी लादू पाहणाऱ्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने फवारणीपंपांची अनावश्यक खरेदी करून तिसरा गैरव्यवहारच केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.राष्ट्रीय कृषीविकास योजनेंतर्गत एकात्मिक भात उत्पादक कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला. भातपिकाच्या रक्षणासाठी ७५ हजार ६०० रक्षक सापळे मागवण्यात आले. त्यासाठी ८ लाख ३१ हजार ६०० रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हे सापळे भातकापणीनंतर उपलब्ध झाल्यामुळे हे सापळे अजूनही कृषी कार्यालयाच्या गोडावूनमध्येच पडून आहेत. पाच अश्वशक्तीच्या ११९८ शेतीपंपांची खरेदी कृषी कार्यालयाने केली आहे. पंपाची किमत २४ हजार असून, १० हजार अनुदान दिले तरी १४ हजार मात्र शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. याबाबत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातच अनावश्यक फवारणी पंप खरेदी करून तालुका कृषी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत.फवारणी पंपाची किंमत आठ हजार रूपये आहे, तर पंप सुरू करण्यासाठी लागणारी दोन अश्वशक्तीची मशीन मात्र शेतकऱ्यांना स्वत: खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करावे लागणार आहेत. शासनाकडून पंपासाठी केवळ चार हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असले तरी १४ हजार रूपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता, खरेदी करण्यात आलेले फवारणी पंप वापरले जाऊ शकत नाहीत. कोकणातील शेतकरी नॅपसॅक, ‘गटोर, फूट स्प्रेअर, पॉवरस्प्रेअरसारखेच फवारणी पंप वापरतात. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने खरेदी केलेले फवारणी पंप सुरू करण्यासाठी दोन अश्वशक्तीची मशीन खरेदी करावी लागणार आहे. अन्यथा ट्रॅक्टर, पॉवर टिलरला जोडून सुरू केला जाऊ शकतोे. कोकणातील गरीब शेतकऱ्यांकडील शेतीचे क्षेत्रही गुंठ्यावर आहे. कमी आकारमानाच्या क्षेत्रात बारमाही शेती, उत्पादन घेतले जात नसल्यामुळे अशा प्रकारच्या पंपाचा वापर केला जाऊ शकत नाही. जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवण्यात येत असून, कमिटीवर जिल्हाधिकारी अध्यक्ष, तर जिल्हा कृषी अधीक्षक सदस्य सचिव आहेत. शेतकऱ्यांकडून वैयक्तिक प्रस्ताव आल्यानंतरच त्यांना मान्यता दिली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतरच पॉवर टिलर, ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, ग्रासकटरसारखी यांत्रिक अवजारे मागवण्यात येतात किंवा शेतकऱ्यांना खरेदी करण्याची परवानगी देऊन अनुदान वितरीत केले जाते. यांत्रिक अवजारांसाठी तालुका कृषी कार्यालयांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविलेले प्रस्ताव धूळ खात पडले असून, ८०० फवारणी पंपांची खरेदीही अनावश्यकच असल्याचे स्पष्ट होत आहे. नऊ तालुका कृषी कार्यालयांकडे ८८ ते ९० फवारणी पंप विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना हे पंप दाखवल्यानंतर ते नाकारले जात आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयावर फवारणी पंप विक्रीचा बोजा येऊन पडला आहे. (प्रतिनिधी)उफराटा न्यायपाच अश्वशक्तीचे ११९८ शेतीपंप तसेच रक्षक सापळ्याबरोबर अनावश्यक ८०० फवारणी पंपांची थेट खरेदी.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचा उफराटा न्याय.फवारणी पंपाची किंमत आठ हजार रूपये तर पंप सुरू करण्यासाठी लागणारी दोन अश्वशक्तीची मशीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना द्यावे लागणार १० हजार रूपये.