विनापरवाना वाळू वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:41+5:302021-04-18T04:31:41+5:30

मंडणगड : तालुक्यातील देव्हारे गोटा येथे गेल्या काही महिन्यांपासून रात्रंदिवस अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. शासनाची कोणतीही रॉयल्टी न ...

Unlicensed sand transport | विनापरवाना वाळू वाहतूक

विनापरवाना वाळू वाहतूक

Next

मंडणगड : तालुक्यातील देव्हारे गोटा येथे गेल्या काही महिन्यांपासून रात्रंदिवस अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता चोरटी वाळू काढली जात आहे. त्यामुळे महसूल खात्याच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून उत्खनन केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कामगारांचा परतीचा प्रवास

रत्नागिरी : यावर्षीही कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत. कामगारांच्या हाताचे कामही बंद असल्याने इथे रहावे की गावाला परतावे अशा संभ्रमावस्थेत कामगार आहेत. काहींनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी तयारी केली आहे.

विकास कामांचे भूमिपूजन

दापोली : तालुक्यातील बत्तीस गाव उन्हवरे पंचायत समिती गणातील पांगारी येथे चार विकास कामांचे भूमिपुजन करण्यात आले. आमदार योगेश कदम यांनी ही कामे मंजूर केली असून जिल्हा परिषद सदस्य अनंत करंबेळे यांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत आहेत. यावेळी विभागप्रमुख मोहन भागणे तसेच वाडीप्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

रस्त्याचे डांबरीकरण

लांजा : मुंबई ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पेंडखळे, चिपटेवाडीतील २५ वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल दूर झाले आहेत. रस्ता डांबरीकरणाबद्दल जनता तसेच वाहन चालक यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.

गावांना पाणीपुरवठा

खेड : तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. येथील पंचायत समितीने ५९ गावे आणि १९८ वाड्यांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. प्रत्यक्षात चार गावे आणि सहा वाड्यांना शासकीय वाहनाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

चाचणीसाठी झुंबड

चिपळूण : विविध कंपन्यांतील कर्मचारी तसेच इतर आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच अन्य व्यावसायिकांनाही कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. त्यामुळे आता नागरिक कोरोना चाचणीसाठी केंद्रांवर गर्दी करू लागले आहेत.

सागरी सुरक्षा प्रभावी

रत्नागिरी : सागरी सुरक्षा अधिक प्रभावी व्हावी यासाठी येथील तटरक्षक दलात आयसीजीएस - अग्रीम, आयसीजीएस - अचूक या दोन बोटींची नव्याने भर पडली आहे. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या बोटींमुळे अलिबाग ते दापोली परिसरातील सागरी सुरक्षा अधिक प्रभावी होणार आहे.

शिवभोजन थाळी बंद

दापोली : शासनाने कष्टकरी मजूर कामगार वर्ग यांच्यासाठी १० रुपयात शिवभोजन थाळी सुरू केली होती. कोरोना काळात ही थाळी पाच रुपयांमध्ये मिळत होती. कोरोनाचे संकट वाढल्याने आता गरिबांना ही थाळी मोफत पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र दापोलीतील केंद्र बंद करण्यात आले आहे.

गोवळकोट शाळेत मार्गदर्शन

चिपळूण : शहरानजीकच्या गोवळकोट येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत महिला व बाल सुरक्षा विषयावर नुकतेच मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. चिपळूण ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे यांनी बालकांवरील लैंगिक अत्याचार, बचाव करण्यासाठी घ्यावयाची दक्षता, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार याविषयी मार्गदर्शन केले.

कर्मचाऱ्यांना पगारवाढ

रत्नागिरी : एलआयसी कर्मचाऱ्यांना १६ टक्के पगारवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पगारवाढीसोबतच सर्व कॅडरमधील कर्मचाऱ्यांना १५०० ते १३,५०० हा विशेष भत्ताही जाहीर करण्यात आला आहे. तसेच पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे.

Web Title: Unlicensed sand transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.