माहेर संस्थेत निराधारांचा आगळावेगळा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:31 AM2021-04-11T04:31:36+5:302021-04-11T04:31:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : निराधारांचा आधारवड ठरलेलया माहेर संस्था हातखंबा रत्नागिरी येथे आगळावेगळा विवाह संपन्न झाला. माहेर संस्थेत ...

Unique marriage of destitute in Maher Sanstha | माहेर संस्थेत निराधारांचा आगळावेगळा विवाह

माहेर संस्थेत निराधारांचा आगळावेगळा विवाह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : निराधारांचा आधारवड ठरलेलया माहेर संस्था हातखंबा रत्नागिरी येथे आगळावेगळा विवाह संपन्न

झाला. माहेर संस्थेत चार वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मोहन गुरव व सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या सुप्रिया

पाडाळकर यांचा अनोखा विवाह माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका ल्युसि कुरीयन यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांच्या पुढाकाराने हा विवाह पार पडला.

ही दोघेही संस्थेत येण्याच्या आधी समाजात एकटेच व रस्त्यावर, तसेच बसस्टँडवर राहून आपला उदरनिर्वाह करीत होते. मोहन गुरव (वय ५५) यांना साखरपा येथून पोलीसपाटील व सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईक नसल्याने माहेर संस्थेत दाखल केले होते, तर सुप्रिया पाडाळकर (५०) यांना राजापूरचे नगरसेवक खलिपे व राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी राजापूर बसस्टँडवर राहत असल्याने माहेर संस्थेत दाखल केले होते.

विवाहाच्या खर्चासाठी दानशूर लोकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार वधूसाठी लागणारे चांदीचे पैंजण पुजा सुर्वे, साडी मैथील नरक, मेहंदी, जाळी, पंचपाळ, चांदीची जोडवी, नथ प्राजक्ता पवार, वराचा पोषाख, पंचा, नारळ, पेढे, हळद, रिया सावंतदेसाई, लग्नसजावटीसाठी लागणारी गोंड्याची फुले, हार, गुच्छ सचिन शिंदे, आइस्क्रीम साैरभ मलुष्ट्ये, जेवणासाठी संदीप डोंगरे यांनी तीन हजार रुपये दिले, तर श्रीखंडाचा खर्च विपूल सुर्वे यांनी केला.

विनय मुकादम यांनी हिंदू रिवाजाप्रमाणे हा विवाह लावला. या विवाहासाठी माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका ल्युसि कुरीयन, माहेर संस्था पुणेचे सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी, मंगेश पोळ, बाळू साकोरे, माहेर संस्था रत्नागिरीचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे, मिरा गायकवाड, शीतल हिवराळे, अमित चव्हाण, रामदास पाटील, शिल्पा डांगे, सीता मिश्रा, विजया कांबळे, नंदिनी पाटील, श्रद्धा चव्हाण, अमित येलवे, जोसेफ दास, अशिष मुळये तसेच देणगीदार, प्राजक्ता पवार, सचिन शिंदे, वैभव मुकादम, चंद्रशेखर चव्हाण, माहेर संस्था हातखंबा व खेडशी येथील संस्थेतील मुले, महिला,पुरुष व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात या विवाहाने एकमेकांना आधार मिळाल्याने नव वधूवरांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहण्याचा योग संस्थेमुळे आला. खऱ्या अर्धाने या जोडप्याच्या नवजीवनाची सुरुवात झाल्याची भावना ल्युसी कुरीयन व सुनील कांबळे यांनी व्यक्‍त केली.

Web Title: Unique marriage of destitute in Maher Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.