शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

 स्रीधन परत करून रत्नागिरी पोलिसांची अनोखी भाऊबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 18:35 IST

दीपावलीच्या मंगल व पावित्र्यपूर्ण वातावरणात पोलिसांनी भाऊबीजेची अनोखी भेट सर्वांना दिली. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल झालेनंतर परत मिळालेल्या मुद्देमालातले स्रीधन न्यायालयाच्या परवानगीने महिला फिर्यादी भगीनींना परत केला. यातून संबधितांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद समाधान मिळवून देत होता.

ठळक मुद्देपोलीस स्टेशनमध्ये दिवाळी फराळाचे आयोजन प्रदुषणमुक्त फटाक्यांचा आनंद लुटलाकर्तव्य व जबाबदारीचे दर्शन

अरुण आडिवरेकररत्नागिरी : पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात. दीपावलीच्या मंगल व पावित्र्यपूर्ण वातावरणात पोलिसांनी भाऊबीजेची अनोखी भेट सर्वांना दिली. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल झालेनंतर परत मिळालेल्या मुद्देमालात स्त्री धनाचा समावेश असतो. त्याची पैशात किंमत होऊ शकत नाही, कारण त्यांत महिलांच्या आठवणी व भावना गुंतलेल्या असतात. त्यामुळे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला हे स्रीधन न्यायालयाच्या परवानगीने महिला फिर्यादी भगीनींना परत केला. यातून संबधितांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद समाधान मिळवून देत होता.         रस्त्यांवरील अपघात व त्यातील तरुणांचा अकाली मृत्यू संवेदनशील मनाला अस्वस्थ करतो. अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी  हेल्मेटच्या वापरांबावत न्यायालयपण आग्रही आहे. मात्र अद्याप वाहनचालकांना हे बंधन जाचक वाटते. खरे तर आपली सुरक्षितता आपले हाती आहे याचा त्यावेळी नकळत विसर पडतो.

म्हणूनच महिला पोलिसांनी भाऊबीज साजरी करताना आपल्या भाऊरायांना हेल्मेटची भेट देऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे वचन त्यांचेकडून घेतले. यावेळी शहरातून काढलेल्या प्रबोधन फेरीत पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत सामील झाले होते.        एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी जबाबदारीने रजेवरुन परत येऊन कर्तव्यावर हजर झाले होते. या सर्वांच्या समवेत प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिवाळी फराळाचे आयोजन करून प्रदुषणमुक्त फटाक्यांचा आनंद लुटला.धकाधकीच्या जीवनांत छोटया छोट्या गोष्टी मधून कर्तव्य व जबाबदारीचे दर्शन घडवित दिवाळी सणाचा आनंद शोधत समाजाशी असलेले आपुलकी व विश्वासाचे नाते दृढ करण्याचे रत्नागिरी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :diwaliदिवाळीPoliceपोलिस