शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांचा निधी होणार भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 12:57 IST

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात १६१.५ किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. ही वाहिनी टाकण्यासाठीचे खोदकाम करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे. तसेच खोदाईसाठी कमीत कमी दर लावण्यात यावा, अशी मागणी महावितरणकडून करण्यात येऊनसुध्दा अद्याप तसे दर न देण्यात आल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांचा निधी होणार भूमिगत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंबनिधी परत जाण्याची शक्यता

रत्नागिरी : एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात १६१.५ किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. ही वाहिनी टाकण्यासाठीचे खोदकाम करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे.

खोदाईसाठी कमीत कमी दर लावण्यात यावा, अशी मागणी महावितरणकडून करण्यात येऊनसुध्दा अद्याप तसे दर न देण्यात आल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे. यामुळे त्यासाठी मंजूर असलेला १० कोटी ८० लाख २७ हजार रूपयांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाल्याने भूमिगत वाहिन्याच भूमिगत होण्याची शक्यता आहे.उच्चदाब भूमिगत वाहिनी चिपळुणात ५ किलोमीटर, खेडमध्ये ३२ किलोमीटर, दापोलीत ५२ किलोमीटर अशी एकूण ८९ किलोमीटर टाकण्यात येणार आहे. लघुदाब वाहिनी अंतर्गत रत्नागिरीमध्ये ३.५ किलोमीटर, चिपळुणात ९ किलोमीटर, राजापुरात १० किलोमीटर, खेडमध्ये ५० किलोमीटर मिळून एकूण ७२.५ किलोमीटर भूमिगत वाहिन्यांचे काम करण्यात येणार आहे.

लघुदाब वाहिनीच्या कामासाठी एकूण ३ कोटी ५९ लाख ६० हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे, तर उच्चदाब वाहिनीसाठी ७ कोटी २० लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, भूमिगत वाहिन्यांच्या खोदकामाला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत असल्यामुळे कामे सुरू होण्यापूर्वीच थांबली आहेत. तसेच काही ग्रामपंचायतींनी खोदाईसाठी परवानगी देताना आकारलेल्या कराची रक्कम ही भूमिगत वाहिनीसाठी मंजूर निधीपेक्षा अधिक आहे.एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३६ कोटी ३९ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली शहरांमधील महावितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासह या शहरांची वाढती लोकसंख्या गृहीत धरून ट्रान्स्फॉर्मर क्षमता वाढवणे, नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवणे, गंजलेले कंडक्टर, तारा, विद्युतखांब बदलणे, महावितरण बॉक्स (डीपी) बसवणे, नवीन वीजवाहिनी तसेच भूमिगत वाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.या कामांसाठी रत्नागिरी शहराला ६ कोटी ३९ लाख रुपये, राजापूर - १ करिता ३ कोटी २२ लाख रुपये, चिपळूण शहरासाठी ७ कोटी ९ लाख रुपये, खेडकरिता १० लाख ५६ हजार रुपये, दापोली - १ साठी ७ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर असून, या निधीतून ही कामे सुरू आहेत. याशिवाय सौरऊर्जा पॅनेलची कामे पूर्ण केली जाणार आहे.

रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, दापोलीमध्ये प्रत्येकी २ मिळून एकूण १० किलोवॅटची कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही कामे सुरू करण्यात आली आहेत.खेडमध्ये अंशत: काम सुरूमहावितरणतर्फे ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे भूमिगत वाहिन्यांसाठीच्या खोदकामाचा दर कमी असावा, अशी अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी खोदकामासाठी परवानगी दिली तर लवकरात लवकर काम सुरू होईल. पावसाळा दोन महिन्यांवर आल्यामुळे लवकर परवानगी मिळणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी लोकसेवेमुळे दर कमी केला असल्याने कराचे पैसे महावितरणने भरले आहेत. खेडमध्ये अंशत: काम सुरू झाले असले तरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये परवानगीअभावी काम रखडले आहे.- पी. जी. पेठकर,प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरण