शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतदेहाला मिळाले जबाबदार खांदे, रत्नागिरीत माणुसकीची भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 14:02 IST

Social, Ratnagirinews, Hospital रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या प्रौढाचे उपचार सुरू असताना निधन झाले. गरीब कुटुंबातील असलेल्या व्यक्तीची पत्नी त्यांच्यासोबत होती. अन्य कोणीच नातेवाईक नव्हते. मृत व्यक्ती पोलादपूरची असल्याने अंत्यसंस्कारासाठी गावी नेणे अशक्य होते. मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणी करावे, हा प्रश्न पुढे येताच संकल्प युनिक फाऊंडेशनने जबाबदारी घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

ठळक मुद्देबेवारस मृतदेहाला मिळाले जबाबदार खांदेरत्नागिरीतील युनिक फाऊंडेशनची माणुसकीची भिंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या प्रौढाचे उपचार सुरू असताना निधन झाले. गरीब कुटुंबातील असलेल्या व्यक्तीची पत्नी त्यांच्यासोबत होती. अन्य कोणीच नातेवाईक नव्हते. मृत व्यक्ती पोलादपूरची असल्याने अंत्यसंस्कारासाठी गावी नेणे अशक्य होते. मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणी करावे, हा प्रश्न पुढे येताच संकल्प युनिक फाऊंडेशनने जबाबदारी घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.संतोष काशीराम गोरे (३७) यांचे उपचार सुरू असतानाच सोमवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे निधन झाले. सोबत त्यांची पत्नी होती, अन्य कोणतेही नातेवाईक नव्हते. मूळ गाव पोलादपूर, परंतु सध्या त्यांचे वास्तव्य पाली येथे होते. पोलादपूर येथून नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी येण्यास तयार नव्हते. मृत व्यक्ती कोरोनाग्रस्त नसल्याने तसा वैद्यकीय अहवालही जिल्हा शासकीय रुग्णालयातून देण्यात आला होता. परंतु तरीही कोणी यायला तयार नव्हते.त्यामुळे मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला. ही बाब रमजान गोलंदाज यांनी संकल्प युनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांना कळविली. कोंडकरी यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन आपली संस्था अंत्यसंस्कार करेल, असा विश्वास दर्शविला. ही संस्था सातत्याने अशा कार्यात पुढे आहे.घेतली सगळी जबाबदारीसंस्थेचे सल्लागार, नगरसेवक सुहेल मुकादम यांनी ही जबाबदारी घेत संस्थेतर्फे मृतदेहावर बुधवारी सकाळी १० वाजता चर्मालय येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांच्या समवेत सुहेल मुकादम, शकील गवाणकर, रूपेश चव्हाण, नाझीम मजगावकर, आसीम इब्जी यांनी लाकडे वाहण्यापासून सरणावर प्रेत ठेवणे, यासाठी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकRatnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल