शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Uday Samant: "ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, तेही नाराज न होता काम करतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 15:57 IST

Uday Samant: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत

मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच, मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याने विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टिका केली जात आहे. तर, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच हा शब्द घेऊन या प्रश्नावर निश्चित उत्तर देण्याचं टाळत आहेत. आता, शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनीही मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे म्हटले. तसेच, ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते नाराज होणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मिटिंगसाठी दिल्लीत आहेत. तेथूनच त्यांनी मंत्री मंडळ विस्ताराची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधक आम्हाला हिणवत आहेत. परंतु, सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या केसचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. येत्या काही कालावधीतच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे उदय सामंत यांनी रत्नागिरीत आपल्या पाली येथील निवास्थानी बोलताना सांगितले. 

ज्यावेळी मंत्री मंडळाचा विस्तार होत असतो, त्यावेळी प्रत्येकाला आपण मंत्री व्हावे असे वाटत असते. पण, आम्ही शिंदे साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जो विस्तार करतील, ज्यांच्यावर जी जबाबदारी देतील ती आम्ही पार पाडू. ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही तेही नाराज न होता काम करतील. कारण, आम्ही शिंदे समर्थक आहोत, असे सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना सांगितले. 

वैयक्तिक टीका टिपण्णी नको

दरम्यान, दीपक केसरकर यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले युतीमध्ये काम करत असताना वैयक्तिक टीका टिपण्णी करणे हे दोन्ही बाजुने योग्य नाही. दीपक केसरकर हे चांगले प्रवक्ते आहेत. तसेच युतीचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते परिपक्व आहेत. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. परंतु, वैयक्तिक टीका टिप्पणी करणे, दोन्ही बाजूने थांबले पाहिजे असा सल्लादेखील सामंत यांनी राणे व केसरकर वादावर बोलताना दिला आहे.

याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होतोय का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघांनी नकार दिला. परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतministerमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस