शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील हौशी रेल्वेप्रेमी; २३ व्या नव्या गाड्यांच्या पहिल्या फेरीचे 'ते' एकमेव मानकरी

By शोभना कांबळे | Updated: June 29, 2023 16:53 IST

१९९६ सालापासून रत्नागिरीतून पुढे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील नव्या ट्रेनमधून प्रवास

शोभना कांबळेरत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक, हाैशी रेल्वेप्रेमी उदय बाेडस यांनी कोकण मार्गावरील २३ व्या नव्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मधून प्रवास करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. बुधवारी त्यांनी या रेल्वेतून सपत्निक पहिला व्यावसायिक प्रवास केला.प्रा. उदय बोडस कोकण रेल्वे मार्गावर १९९६ सालापासून आतापर्यंत रत्नागिरीतून गेलेल्या २२ नव्या गाड्यांचा पहिला व्यावसायिक प्रवास करणारे एकमेव प्रवासी आहेत. २ जून रोजी वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन फेरीच्या प्रवासाला आवश्यक तो पास त्यांनी मिळवला होता. पण दुर्दैवाने ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर या सोहळ्याची तारीख २७ जून जाहीर करण्यात आली होती.मात्र, मंगळवार, दि. २७ रोजी मडगाव येथून उदघाटन होऊन निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सहभागी न होता उदय बोडस यांनी बुधवार २८ जून रोजी रत्नागिरी - मडगाव असा या नव्या रेल्वेतून प्रवास केला. सकाळी मुसळधार पावसात उदय बोडस आणि त्यांची पत्नी साधना बोडस रत्नागिरीच्या रेल्वे स्थानकावर पोहोचले. १७ डब्यांची ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रत्नागिरीकडे येत असताना तिचे आधुनिक रूप विलोभनीय दिसत असल्याचे प्रा. बोडस यांनी सांगितले. रत्नागिरीत ही ट्रेन निर्धारित वेळेआधीच पोहोचली. रत्नागिरीत येण्याची वेळ सकाळी १०:४० असतानाच या ट्रेनचे आगमन १०: ३५ ला झाले. यातून दहा प्रवासी रत्नागिरीत आले. तर बोडस दांपत्याबरोबरच रत्नागिरीतून सुमारे १८ ते २० प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करणारे होते. ही ट्रेन १०:४५ वाजता रत्नागिरीतून मडगावकडे मार्गस्थ झाली.या व्यावसायिक उद्घाटन फेरीच्या २३ व्या प्रवासाचे तिकीट २१०० पेक्षा जास्त असून पहिल्या ३ मिनिटात ५३० पैकी १४१ तिकीटे आरक्षित करण्यात आली. या ट्रेनमध्ये बोडस दांपत्याने भोजनाचाही आनंद घेतला. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उदघाटनाचा मुहुर्त हुकला असला तरी उदय बोउस यांनी या गाडीतून पहिल्या व्यावसायिक प्रवासाचा संकल्प अखेर बुधवारी पूर्ण केला.

उदय बोडस यांनी १९९६ सालापासून रत्नागिरीतून पुढे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील नव्या २२ ट्रेनमधून आतापर्यंत प्रवास केला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही २३ वी ट्रेन आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये पहिल्याच कोचमध्ये त्यांचा आणि पत्नीचा आसनक्रमांक २३ आणि २४ असा होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वे