शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

सत्ताधाऱ्यांमध्येच ‘झोंबाझोंबी’चे प्रकार

By admin | Updated: May 19, 2016 00:15 IST

दोन माजी सभापतींमध्ये कलगीतुरा : पत्रिकेवर नसणाऱ्या विषयावरच रणकंदन

चिपळूण : मार्च महिन्यात झालेल्या ठरावावर इतिवृत्त मंजुरीच्यावेळी माजी सभापती संतोष चव्हाण व माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांच्यात शाब्दिक झोंबाझोंबी झाली. सेसच्या कामावरुन मार्च महिन्यात ठराव झाला होता. त्यानंतर चिवेली येथे झालेल्या मासिक सभेत त्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. असे असतानाही त्याच विषयावर पुन्हा चव्हाण यांनी चर्चा सुरु केल्याने माजी सभापती जितेंद्र चव्हाण व सदस्य दिलीप मोरे यांनी जोरदार आक्षेप घेतला. दोन माजी सभापतींमध्ये कलगीतुरा रंगला असताना सभापती स्नेहा मेस्त्री यांनी मात्र सक्षमपणे हा विषय हाताळला. चव्हाण यांनी सेसमधून केलेल्या कामाबाबत मार्च महिन्याच्या मासिक सभेत ठराव झाला होता. हा ठराव करताना आपले मत जाणून घ्यायला हवे होते. त्यामुळे असा ठराव करता येत नाही, असे चव्हाण यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर जितेंद्र चव्हाण व दिलीप मोरे यांनी जोरदार हल्ला चढवला. सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर असा ठराव होऊ शकतो. तसेच या सभेचे इतिवृत्त चिवेली येथे मंजूर झाले आहे. आता विषय पत्रिकेवर विषय नसल्याने त्यावर चर्चा नको. सभागृहाचा वेळ वाया घालवू नका, असे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी संतोष चव्हाण व जितेंद्र चव्हाण हे दोघेही आक्रमक झाले होते. यावेळी दोघांमध्ये ‘तू तू मैं मैं’ झाले. यावेळी दिलीप मोरे यांनी जितेंद्र चव्हाण यांना साथ केली. अखेर या विषयावर आयत्यावेळीच्या विषयात चर्चा केली जाईल असे सांगताच सभागृह शांत झाले. इतिवृत्ताला मंजुरी दिल्यानंतर कार्यवाहीवर चर्चा झाली. त्यानंतर विकासकामांना मंजुरी देण्याचा ठराव आला असता, संतोष चव्हाण यांनी पुन्हा मुद्दा उकरुन काढला. यावेळी सभापती मेस्त्री यांनी चव्हाण यांना ही कामे समाजकल्याणमधील आहेत, असे सुनावले. या कामांना मंजुरी देताना त्यांना पैसे कुठून आणणार? असा सवाल माजी सभापती सुरेश खापले यांनी उपस्थित केला व प्रशासनाने याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली. यावरही जितेंद्र चव्हाण, दिलीप मोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी खापले यांनी सांगितले की, माझा ठरावाला विरोध नाही. परंतु, वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडा. मी ठराव रद्द करा, असे म्हणालेलो नाही. असे असताना आपण असे का रियाक्ट होत आहात? खापले यांच्या मागणीवर आपण सभापती असताना कधी नियोजन केले नाही. आता कशाला सांगताय? पुढचे पुढे पाहता येईल. आता सर्व कामांना मंजुरी द्या, असा रेटा चव्हाण व मोरे यांनी लावला. या विषयावर प्रशासनाला जबाबदार धरु नका. प्रशासनाचा काय संबंध? कोणती कामे करायची किंवा नाही हे सभागृह ठरवते. यावर चर्चा झाल्यानंतर कोळकेवाडी पठारवाडी, वीर शाळा दुरुस्तीसाठी निधीची तरतूद व्हावी, असे खापले यांनी सांगितले. आत्ता मुद्याचे बोललात, असे सांगून चव्हाण व मोरे यांनी खापले यांची खिल्ली उडवली. यानंतर सभागृह शांत झाले व विविध विषयांचा विभागवार आढावा घेण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाचा आढावा घेताना गुहागर - विजापूर या मार्गावर सामाजिक वनीकरणतर्फे झाडे लावली जात आहेत. मुळात हा रस्ता चौपदरीकरण होणार आहे. मग ही झाडे पुन्हा तोडावी लागतील. शासनाचा पैसा वाया जाईल त्याचे काय? कौंढरताम्हाणे परिसरात रस्त्यालगत असलेली झाडे लाकूड व्यापाऱ्यांनी तोडली. याबाबत आम्ही तक्रार केली त्याचे काय झाले? त्यांच्यावर कारवाई कोण करणार? आपण झाडे लावायची आणि व्यापाऱ्यांनी तोडून न्यायची हे बरोबर नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. उपसभापती नंदकिशोर शिर्के यांनीही त्याला दुजोरा दिला. शेवटी उपसभापती शिर्के यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)