शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मुचकुंदी नदीत दोघे वाहून गेले; एक बचावला, दुसऱ्याचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:44 IST

खेडपाठोपाठ लांजात दुर्घटना

लांजा : मुचकुंदी नदीतून पलीकडे देवदर्शनासाठी जात असताना प्रभानवल्ली येथील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. यातील एकजण बचावला असून, दुसऱ्याचा शोध अजून सुरू आहे.प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील मिलिंद विजय खेगडे (वय २८) व केतन श्रीपत खेगडे (वय ३५) हे दोघेजण मुचकुंदी नदीतून दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान पलीकडे असलेल्या मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जोरदार प्रवाहात ते वाहून गेले. यातील मिलिंद विजय खेगडे यांचे दैव बलवत्तर म्हणून ते वाहत असताना बालंबाल बचावले. मात्र केतन खेगडे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.लांजा पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, तहसीलदार प्रियांका ढोले यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. दोन दिवस थोडीशी उघडीप दिल्यानंतर शुक्रवारी पावसाचा जोर वाढला होता. या पावसामुळे तालुक्यातील पाचही नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.

खेडपाठोपाठ लांजात दुर्घटनादीड दिवसांच्या गणपती विसर्जनाप्रसंगी खेड तालुक्यात भोस्ते येथील मंगेश पाटील हा तरुण बुडाला होता. त्याचा मृतदेह तब्बल २२ तासांनी हाती आला. यापाठोपाठ आता लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे ही घटना घडली आहे. पाण्यात बेपत्ता झालेल्या केतन खेगडे सुखरुप सापडू दे, अशी प्रार्थना लोक करत आहेत.