शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; लोटेतील कोकरे महाराजासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:48 IST

दोन दिवसांची पोलिस कोठडी

खेड : तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्तिधाम सेवा संस्था संचालित गोशाळेचे सर्वेसर्वा ह.भ.प. भगवान कोकरे महाराज व त्यांचे साथीदार प्रीतेश प्रभाकर कदम यांना अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली. ही घटना २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार मागील काही काळापासून भगवान कोकरे यांनी अनेकदा या पीडित मुलीशी अश्लील वर्तन केले. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.

सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडितेने गुरुकुलातीलच एका सदस्याला घटना सांगितली. त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस, महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख आहे, असे धमकावत गप्प राहण्यास सांगितले तसेच जर कोणाला काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल, असेही तिला सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.पीडितेच्या बाबतीत वारंवार अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आणि अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला. कुटुंबीयांनी पोलिस स्थानकात धाव घेतली व यासंदर्भात तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत कलम १२ व १७ आणि भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३५१ (३), ८५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. मंगळवारीच भगवान कोकरे आणि प्रीतेश कदम या दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तपासाला गतीखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशांक सणस व पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिस अधिक गांभीर्याने तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Minor Girl Molested; Two Arrested, Including Kokare Maharaj

Web Summary : Kokare Maharaj and an accomplice were arrested in Ratnagiri for allegedly molesting a minor girl. The incidents occurred between September 21st and October 2nd. Both are now in police custody following the complaint.