शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मध्ययुगीन बारव, तलावांचा अनमोल ठेवा; राजापूर तालुक्यात कोणत्या परिसरात आहे अस्तित्व.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:18 IST

कोकणात काही ठिकाणी ‘घोडेबाव’, असेही म्हणतात

राजापूर : तालुक्यातील कोतापूर तिठा, धाउलवल्ली परिसरात दोन मध्ययुगीन बारव व एक तलाव आढळला आहे. या बारव व तलाव हे मध्ययुगीन कालखंडातील जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असल्याचे मत पुणे येथील इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी व्यक्त केले आहे.राजापूर-धारतळे मार्गावर कोतापूर तिठा या ठिकाणी असणाऱ्या प्रवासी मार्ग निवाराशेडच्या मागच्या बाजूला साधारण १०० मीटरवर जंगलमय भागात एक बारव (पायऱ्यांची विहीर) आढळली आहे. ती नंदा बारव प्रकारातील आहे. ही बारव पूर्णत: कातळात खोदलेली असून, साधारण ५० ते ६० फूट खोल आहे. या विहिरीला एका बाजूने आतमध्ये उतरण्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे उतरणाऱ्या पायऱ्या आहेत. त्यांची संख्या साधारण ५०च्या आसपास आहे.इथूनच पुढे धारतळे येथे एक तलाव असून, सद्य:स्थितीत त्यावर अलीकडच्या काळात कठडा बांधण्यात आला आहे. साधारण ५० ते ६० फूट लांब असणाऱ्या या तलावाची रुंदी २५ ते ३० फूट आहे. हा तलावही नंदा प्रकारातील असावा.धारतळेपासून साधारण पाच किलोमीटरच्या अंतरावर पाणेरे फाटा येथेही एक नंदा प्रकारातील बारव असून, ही बारव कोतापूर येथील बारवशी मिळती जुळती आहे. सध्या ही बारव पाण्याने पूर्ण भरलेली आहे. अशा बारवांना कोकणात काही ठिकाणी ‘घोडेबाव’, असेही म्हणतात.बारव - कुंडहा मुळात या वास्तूप्रकाराचा आधारभूत घटक ठरतो. या कुंडाच्या वर विशिष्ट पायऱ्या देऊन एक पटांगण सोपान टप्पा ठेवत. त्यानंतर दुसरा व तिसरा सोपान ठेवून झालेला विस्तार बारव स्थापत्यात पहावयास मिळतो. एकूण एकात एक लहान होत जाणारे कुंड असे याचे स्वरूप असते. बारवेत विविध देवतांची स्थापना केलेली असते. बारवेत चौरस हा आकार प्रामुख्याने असतो. आयत व क्वचित अष्टकोनी आकार पाहावयास मिळतात. बारवेस एक ते चार मुख्य प्रवेश असतात.

कोकणात अशा बारव अस्तित्वात असून, त्याच्या स्थापत्याचे अनेक विविध प्रकार आहेत. त्यातील अनेक रचना कोकणात आढळतात. कोंढेतड येथील वापी व तडाग त्यानंतर कोतापूर, धारतळे व पाणेरे फाटा येथे आढळून आलेल्या बारवा व तलाव मध्ययुगीन जलस्थापनेच्या प्रगत दृष्टिकोनाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे जतन, संवर्धन होणे महत्त्वाचे आहे. - अनिल दुधाणे, इतिहास संशोधक, पुणे