शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाची किमया! ऑक्टोबरमध्येच आला आंब्याला मोहोर

By मेहरून नाकाडे | Updated: October 18, 2022 19:21 IST

परतीच्या पावसामुळे मोहोर वाचविणे खर्चिक तर आहे, शिवाय जिकरीचेही आहे

रत्नागिरी : अद्याप परतीचा पाऊस जिल्ह्यात धुमाकूळ घालत असतानाच निसर्गातील बदलामुळे ऑक्टोबरमध्ये आंब्याला मोहोर आला आहे. मजगाव येथील राजन कदम यांच्या आंबा बागेतील दोन कलमांना मोहोर आला आहे. बागायतदार कदम मोहोर वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असून आतापर्यत त्यांनी बुरशी व कीटकनाशक फवारणी केली आहे. त्यामुळे मोहोर चांगला आहे.गेल्या आठवड्यात एका कलमाच्या फांदीला मोहोर निदर्शनास आला होता. मात्र आठवडाभरात दोन कलमांना चांगलाच मोहोर आला आहे. परतीच्या पावसामुळे मोहोर वाचविणे खर्चिक तर आहे, शिवाय जिकरीचेही आहे. वानरांचा होणारा उपद्रव लक्षात घेता दोन कलमांसाठी राखणी ठेवणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे बागायतदार कदम यांनी कलमांच्या भोवती जाळी बांधली आहे. पावसामुळे मोहोराचे नुकसान होवू नये यासाठी त्यांनी ताडपत्री बांधण्याचा निर्णय घेतला आहे.ऊन, पाऊस तसेच ढगाळ हवामान यामुळे मोहोरावर कीडरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी केली आहे. हवामान खात्याने दि.२० ऑक्टोबर पर्यंतच पाऊस असेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे तूर्तास मोहोर संरक्षणासाठी ताडपत्री बांधलेली नसली तरी पावसाचा अंदाज घेत ताडपत्री बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मोहोर चांगला असून कोणत्याही रोगाचा प्रादूर्भाव नाही. मोहोर सुरक्षित राहिला तर फळधारणा होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे.

निसर्गातील बदलामुळेच एेन पावसाळ्यात मोहोर आला आहे. मोहोर वाचविणे खर्चिक तर आहे, शिवाय अवघड काम आहे. मोहोराचा अंदाज घेत फवारणी करणे आवश्यक आहे. पावसापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. मोहोर वाचला तर नक्की फळधारणा चांगली होईल. - विनोद हेगडे, तंत्र, कृषी अधिकारी, कृषी विभाग, रत्नागिरी. 

गेल्या आठवड्यात झाडाच्या एका फांदीला मोहोर निदर्शनास आला होता. मात्र हळूहळू मोहोर पूर्ण झाडाला आहे. सध्या तरी दोनच झाडांना मोहोर आहे. मोहोराचे वानरापासून संरक्षण करण्यासाठी जाळी लावली आहे. तसेच पावसापासून संरक्षण करण्यासाठी ताडपत्री बांधण्याचा निर्णय घेतला आहे. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाRainपाऊस