शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: शिसे चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:00 IST

विशेष तपास पथक

राजापूर : तालुक्यातील कातळी सडा येथील चोरीस गेलेले तब्बल १,४७,२०० रुपये किमतीचे ४६० किलो वजनाचे शिसे १२ तासांत हस्तगत करण्यात नाटे सागरी पोलिसांना यश आले आहे. या चोरीत सहभागी असलेल्या दोन आरोपींना पाेलिसांनी अटक केली आहे.मुबिन अब्दुल सत्तार सोलकर (वय ३०, रा. धालवली-मुस्लिमवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), समीर कुदबुद्दिन सोलकर (रा. कातळी, ता. राजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत नासीर इसहाक मजगावकर (४७, रा. कातळी, राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. चंद्रशेखर रजनीकांत कुश्ये (रा. मेढा, ता. मालवण) यांच्या मालकीचे पर्सनेट मच्छिमारी जाळे त्यांनी दुरुस्तीसाठी आणून कातळी सडा येथील शब्बीर नाखेरकर यांच्या कंपाउंडमध्ये १८ जूनला काळ्या ताडपत्रीने झाकून ठेवले होते. मात्र, दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी तपासणी केली असता जाळीला लावलेले सुमारे ६४० किलो वजनाचे शिसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नाटे सागरी पोलिस स्थानकात ८ ऑक्टाेबर राेजी फिर्याद देताच पाेलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला हाेता. पाेलिसांनी मुबिन अब्दुल सत्तार सोलकर आणि समीर कुदबुद्दिन सोलकर या दाेघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय झगडे करत आहेत.विशेष तपास पथकचाेरीच्या तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले हाेते. तपासादरम्यान तांत्रिक साधनांचा वापर आणि गोपनीय माहितीच्या आधारे पाेलिसांनी संशयितांचा शोध घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Lead Theft Cracked in 12 Hours; Two Arrested

Web Summary : Ratnagiri police solved a lead theft case in 12 hours, recovering stolen lead worth ₹1,47,200 and arresting two individuals involved. The theft occurred in Katali Sada, Rajapur Taluka. Further investigation is underway.