शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील उद्योजकांकडून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 14:23 IST

Court Ratnagiri- रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दीपक गद्रे यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणातील दोघांना न्यायालयाने बुधवारी अडीच वर्षांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात निशांत उर्फ सनी प्रवीण परमार (३१) आणि नरसिंग दशरथ कारभारी (३०, दोन्ही रा. दहिसर मुंबई) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्दे खंडणी मागणाऱ्या दोघांना कैदरत्नागिरीतील उद्योजकांकडून २५ लाखांची खंडणी

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दीपक गद्रे यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणातील दोघांना न्यायालयाने बुधवारी अडीच वर्षांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात निशांत उर्फ सनी प्रवीण परमार (३१) आणि नरसिंग दशरथ कारभारी (३०, दोन्ही रा. दहिसर मुंबई) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.त्यांच्याविरोधात दीपक पांडूरंग गद्रे (रा. पावरहाऊससमोर नाचणे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी निशांत परमार याने दीपक गद्रे यांना फोन केला. मी मुंबईतून बोलतोय असे सांगत तुम्ही एकाला चोरटे पिस्तुल घेण्यास सांगितले होते, तो माणूस माझ्या ताब्यात असून हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हाला २५ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून गद्रे यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दीपक गद्रे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. या आरोपींवर संपूर्ण महाराष्ट्रात ५५ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.याचा तपास करताना ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी निकाल देताना बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी इटकळकर यांनी आरोपींना २ वर्ष ६ महिने साधी कैद आणि १ हजार रुपये दंड तो न भरल्यास १ महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. एस. एस. वाधवणे, अ‍ॅड. इम्रान मुजावर आणि अ‍ॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. तसेच तपासिक अंमदलार म्हणून ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम, पोलीस नाईक अमित कदम, हेड कॉन्स्टेबल दिडपिसे, पोलीस नाईक विलास जाधव यांनी तर पैरवि अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस फौजदार अनंत जाधव आणि मदतनीस म्हणून महिला पोलीस नाईक संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी