शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

समुद्री कासवांना मिळणार जीवदान; तयार केले 'टीईडी' उपकरण, कसे काम करणार.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:41 IST

अमेरिकेत काेळंबी जाणे शक्य

शिवाजी गोरेदापोली (जि.रत्नागिरी) : कोकण किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची अंडी संवर्धित करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, दुसरीकडे मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून कासवांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कासवांचा मृत्यू रोखण्यासाठी कासव अपवर्जक साधन अर्थात टर्टल एक्सक्लुडर उपकरण (टीईडी) तयार केले आहे. या उपकरणामुळे जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांची सुखरूप सुटका होण्यास मदत होणार आहे.शासनाच्या बंदर विभाग, नेट फिश एमपीईडीए, दापोली कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिले टीईडी उपकरण तयार करण्यात आले आहे. हे उपकरण धातूच्या पट्ट्या आणि जाळीपासून बनलेले असून, ट्रॉलिंग जाळीला बसविण्यात आले आहे. त्यामुळे कोळंबी बारमधून जाळीच्या मागील बाजूस जातात, तेव्हा कासव आणि इतर मोठे प्राणी धातूच्या जाळीला धडकतात आणि जाळीतून पुन्हा बाहेर पडतात.या उपकरणाचे प्रात्यक्षिक दापाेली तालुक्यातील हर्णे बंदरात घेण्यात आले. यावेळी बंदर परवाना अधिकारी दीप्ती साळवी, नेट फिश संस्थेचे राज्य समन्वयक संतोष कदम, अतुल साठे, गोपीचंद चौगुले यांच्यासह मच्छीमार उपस्थित होते.

अमेरिकेत काेळंबी जाणे शक्यकासवांच्या मृत्यूमुळे अमेरिकेने काेळंबी निर्यातीवर २०१९ पासून बंदी घातली आहे. मात्र, या उपकरणामुळे कासवांचे प्राण वाचल्यास काेळंबीवर घातलेली निर्यातबंदी उठविण्यास मदत हाेणार आहे. त्यासाठी हे उपकरण वापरण्याचे केंद्र सरकारने सक्तीचे केले आहे.

टीईडी पद्धतीमुळे अमेरिकेने लादलेली काेळंबीवरील निर्यातबंदी उठवण्यास मदत होणार आहे. निर्यातबंदीमुळे गेल्या सहा वर्षांपासून कोळंबीचे दर पडले असून, ४० टक्के निर्यात कमी झालेली आहे.- गोपीचंद चौगुले, अभ्यासक. 

ट्राॅलिंगवर टीईडी उपकरण बसवणे शासनाने बंधनकारक केले आहे. परंतु, उपकरण उपलब्ध होत नसल्याने तसेच मच्छीमारांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याने कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. - संतोष कदम, राज्य समन्वयक, एमपीईडीए मुंबई

शासनाने अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रात्यक्षिक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मच्छीमारांनी काळजीपूर्वक प्रात्यक्षिक पाहणे गरजेचे आहे. अंमलबजावणी झाल्यानंतर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. - दीप्ती साळवी, परवाना अधिकारी, दाभोळ

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग