शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेरळमध्ये विहिरीसाठीच्या सुरुंगामुळे घराला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 14:02 IST

Lanja Ratnagirinews-लांजा तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीच्या रुंदीकरणाचे काम करीत असताना लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे शेजारील घरांना तडे जात असल्याची तक्रार महंमद फकी यांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देनळपाणी योजनेच्या विहिरीचे रुंदीकरण लांजा तहसीलदारांकडे तक्रार

लांजा : तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीच्या रुंदीकरणाचे काम करीत असताना लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे शेजारील घरांना तडे जात असल्याची तक्रार महंमद फकी यांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.तहसीलदार समाधान गायकवाड यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वेरळ येथील आपल्या मिळकतीत पूर्वी जुनी विहीर होती. सन २०१९ मध्ये ग्रामपंचायत वेरळ यांनी या विहिरीचे नवीन बांधकाम दाखवून निधी खर्ची घातला. त्याबाबत आपण दि. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी ग्रामपंचायत वेरळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. त्यानंतर दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीमार्फत नळपाणी योजनेतंर्गत विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले.त्याबाबत आपण वेरळ ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर केवळ दोन ते तीन दिवस काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दि. १५ फेब्रुवारीपासून कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटदाराने विहिरीत सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. आपले घर या विहिरीजवळ आहे. घरात वयोवृद्ध आई, छोटा मुलगा, भाची आणि मी राहतो. विहिरीत लावण्यात येणाऱ्या सुरूंगामुळे माझ्या घराला हादरे बसत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे आपले घर राहण्यासाठी धोकादायक बनले आहे.याबाबत दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा ग्रामपंचायत सरपंच यांना भेटून सुरूंगामुळे घराला तडे जात असल्याचे सांगून काम थांबवावे, अशी विनंती केली होती. त्यानंतर सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी या घराची पाहणी करून भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.आधी स्फोट थांबवाग्रामसभेतही आपण हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अद्यापही विहिरीत सुरूंग लावण्याचे काम सुरूच असल्याने माझ्या घराला तडे जाऊन आमच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपल्याला नुकसान भरपाई मिळावी आणि विहिरीत लावण्यात येणारे सुरुंगाचे काम ताबडतोब थांबविण्यात यावे अशी मागणी महंमद फकी यांनी केली आहे.

टॅग्स :Lanja Police Thaneलांजा पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी