शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस असल्याचे भासवून फसवणुकीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:21 IST

पोलीस वेश परिधान करून व राजापूर पोलीस स्थानकात पोलीस हेडकाँस्टेबल असल्याचे सांगून शहरातील एका सुवर्णपेढीवर वस्तू खरेदी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तोतया पोलीसाला राजापूरातील जागरूक व्यापारी व नागरिकांनी पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

ठळक मुद्देपोलिस असल्याचे भासवून फसवणुकीचा प्रयत्नराजापुरात व्यापारी नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

राजापूर : पोलीस वेश परिधान करून व राजापूर पोलीस स्थानकात पोलीस हेडकाँस्टेबल असल्याचे सांगून शहरातील एका सुवर्णपेढीवर वस्तू खरेदी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तोतया पोलीसाला राजापूरातील जागरूक व्यापारी व नागरिकांनी पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत या प्रकरणी पोलीसांकडून या तोतया पोलीसाची चौकशी सुरू होती. मात्र उशीरापर्यंत पोलीसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.शहर बाजारपेठेत सोमवारी पोलीसी वेष परिधान करून एक इसम फिरत होता. बाजारपेठेतील नार्वेकर ज्वेलर्समध्ये तो काही सोन्याच्या वस्तु खरेदी करण्यासाठी गेला. आपण राजापूर पोलीस स्थानकात यावेळी मालक प्रशांत नार्वेकर यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबती केली.

त्यावेळी तो काहीसा गोंधळला व त्याने तात्काळ नार्वेकर यांच्या दुकानातून काढता पाय घेतला. याबाबत नार्वेकर यांनी राजापूर पोलीसांत दुरध्वनी करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर नार्वेकर व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी तात्काळ त्या तोतया पोलीसाचा पाठलाग केला.दरम्यान, एस टी डेपोत जाऊन वेश बदलून हा तोतया पोलीस एका खासगी आराम बसने फरार होण्याच्या तयारीत होता. नार्वेकर यांनी त्याला तात्काळ ओळखले.

याबाबत माहिती मिळताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, माजी नगरसेवक विजय गुरव, संतोष सातोसे, सुनिल सातोसे, प्रशांत जाधव, पिंटू शिंदे यांसह नार्वेकर यांनी त्याला पकडून राजापूर पोलीसांच्या स्वाधीन केले.याप्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत राजापूर पोलीसांकडून या तोतया पोलीसाची चौकशी सुरू होती. अशा प्रकारे तोतया पोलीसाच्या वावरामुळे राजापूर शहरात खळबळ उडाली असून पोलीसांनी या अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी होत आहे.

काही दिवसापुर्वी एका अल्पवयीन चोरट्याला राजापुरातील जागरून नागरिक व तरूणांनी पकडून राजापूर पोलीसांच्या स्वाधीन केले होते. त्याने केलेल्या चोरीची कबुलीही दिली होती. मात्र तो अल्पवयीन असल्याने व त्याच्या पालकांनी माफी मागितल्याने पोलीसांनी त्याला सोडून दिले होते.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी