शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर विश्वास टाका, भारत महासत्ता बनेल; राजू शेट्टी यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:39 IST

सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही.

महाड : सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही. जनतेच्या पैशांची लूट आणि विकासकामांची टक्केवारी घेणाऱ्यांना शिवरायांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना किल्ले रायगडावर येऊन महाराजांचे आशीर्वाद घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे परखड मत व्यक्त करताना शेतकऱ्यांवर विश्वास टाकला तर भारत महासत्ता बनेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाचाड येथील मेळाव्यात व्यक्त केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती हे ९० दिवसांचे राज्यव्यापी अभियान सुरू होत असून त्याचा प्रारंभ किल्ले रायगड येथून शनिवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, संदीप जगताप, युवा जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेट्टे, प्रदेश युवती अध्यक्ष पूजा मोरे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, जि. प. सदस्य रामचंद्र शिंदे, राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

देशाची अर्थव्यवस्था उद्योगधंद्यांमुळे नव्हे तर शेतकऱ्यांमुळे वृद्धिंगत झालेली आहे. त्यांच्यावर विश्वास टाकला तर भारत हा जगाचा अन्नदाता बनू शकतो. मात्र, त्यांचा विचार करण्याची मानसिकता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नाही. - राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शनिवारी सकाळी शेट्टी यांनी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत या अभियानाचा प्रारंभ केला.  या  मेळाव्यात शेट्टी यांनी सत्ताधारी व विरोधक या दोघांवरही टीका केली. राज्यकर्ते शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनेतून भ्रष्टाचार करत आहेत. एखादा अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी लाखो रुपये घेत आहेत. या लाचखोरीचा परिणाम सर्व सामान्य जनतेच्या जीवनावर होत आहे. आपल्या या अभियानातून शेतकऱ्यांच्या खऱ्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडू, असे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी