शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात स्वातंत्र्यवीरांना आदरांजली, स्वतंत्र कक्षाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:17 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून बुधवारी येथील विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वतंत्र कक्षाला अनेक नागरिक आणि विद्यार्र्थी यांनी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली. विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, नागरिक यांची दिवसभर रिघ लागली होती.

ठळक मुद्देकारागृहात स्वातंत्र्यवीरांना आदरांजली, स्वतंत्र कक्षाला भेटस्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उभारला

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून बुधवारी येथील विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वतंत्र कक्षाला अनेक नागरिक आणि विद्यार्र्थी यांनी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली. विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, नागरिक यांची दिवसभर रिघ लागली होती.विशेष कारागृहाच्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते, त्यालगत कारागृहाचे अधीक्षक राजेश देशमुख यांच्या प्रयत्नाने विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. यात मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून सुमारे २५ मोठे फलक बसविण्यात आले असून, त्यावर सावरकरांच्या जीवनकार्यासह स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतिंना चित्ररूपाने उजाळा देण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मसमर्पण दिनाचे औचित्य साधून २६ फेब्रुवारी २०१८ रोजी या कक्षाचे उद्घाटन झाले होते.आतापर्यंत रत्नागिरीतील तसेच बाहेरील सुमारे तीन हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. ही वास्तू सावरकरांचे अलौकिक कार्य व स्वातंत्र्यलढा नव्या पिढीसमोर यावा, विद्यार्थ्यांना तो समजावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी या कक्षाला पतितपावन मंदिर विश्वस्तांनी भेट दिली.

त्याचबरोबर शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, तसेच सावरकरप्रेमी नागरिकांचीही दिवसभर दर्शनासाठी आणि हा कक्ष पाहण्यासाठी रिघ लागली होती. शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी, शिरगाव महर्षी कर्वे संस्थेच्या विद्यार्थिनी तसेच वेंगुर्ला येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही या कक्षाला भेट देत सावरकरांना आदरांजली अर्पण केली. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरjailतुरुंगRatnagiriरत्नागिरी