शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: जामगे-विसापुरातील 'आदिवासी बांधवांचा' मरणाच्या जागेसाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:04 IST

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळू असा आक्रमक पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला आहे.

दापोली : तालुक्यातील जामगे-विसापूर येथील आदिवासी कातकरी बांधवांना मरणाच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. या गावातील चार वाडीतील लोकांना त्यांच्या पूर्वीच्या स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यसंस्काराला जलसंधारण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे आदिवासी समाजासमाेर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मशान जागेजवळ पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यास परवानगी देण्यात आली असून, स्मशानशेड बांधण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीची शेड बांधण्यासाठी मंजूर झालेले अडीच लाख रुपयेही परत गेले आहेत.ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाड्यांसाठी जामगे - विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी जागा संपादित केली आहे. या संपादित जागेच्या धरणाच्या खालील बाजूला शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु, सध्या धरणाचे काम प्रगतीपथावर असून, अद्याप सांडवा, प्रवेश व पुच्छ कालव्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या धरणाच्या खालील बाजूस असलेल्या जागेमध्ये पुच्छ कालव्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मशानशेड बांधण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.विसापूर येथील बबन बाबाजी बेंद्रे यांच्याबरोबर या कार्यालयाचे जलसंधारण अधिकारी यांच्यासमवेत दि. १६ नाेव्हेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मौजे जामगे येथील गट क्रमांक २३४ ब मधील योजनेसाठी संपादित क्षेत्र ०-६३-०० हेक्टर आर. वगळून धरणाच्या खालील बाजूला शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये क्षेत्र ०-३४-५० हेक्टर आर. स्मशानशेड बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात आला आहे, असे पत्र दापाेलीतील जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभागातर्फे विसापूर ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे आता अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कार्यालयातच प्रेत जाळू

प्रशासनाने स्मशानशेड बांधण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसील कार्यालयात मृतदेह नेणार आहोत, तेथे प्रेत जाळणार आहोत. गावात धरण बांधू देणार नाही, अधिकाऱ्यांना दगड मारू, असा आक्रमक पवित्रा जामगे येथील आदिवासी बांधवांनी घेतला आहे. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी स्वत: जामगे येथे जाऊन आदिवासी बांधवांची ही समस्या जाणून घेतली. ही समस्या प्रशासनाने सोडवली नाही तर बिरसा फायटर्स संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी